आरोग्यविद्या
Home पुरुष नसबंदी

पुरुष नसबंदी

पुरुष नसबंदी

पुरुष नसबंदी ही एक झटपट शस्त्रक्रिया अहे. स्त्री नसबंदीपेक्षा ती फारच सोपी आणि सुरक्षित आहे. या शस्त्रेक्रियेनंतर तासाभरात घरी जाता येते. या शस्त्रक्रियेत दोन्ही बाजूच्या वीर्यनलिका कापून बांधल्या जातात.  अंडकोशाच्या वरच्या भागात लहान छेद घेऊन ही नस बाहेर काढता येते. शस्त्रक्रियेनंतर दोन-तीन महिने निरोध वापरावा लागतो. कारण वीर्यकोशात साठवलेल्या शुक्रपेशी पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत दोन-तीन महिने जातात. ही काळजी घेतली नाही तर गर्भधारणा होऊ शकते.

या अत्यंत सोप्या व निर्धोक शस्त्रक्रियेचा पुन्हा प्रसार होणे आवश्यक आहे. पुरुषी अहंकारापोटी व 'अशक्तपणा येतो' हे खोटे कारण सांगून पुरुष टाळाटाळ करतात व स्त्रियांवर शस्त्रक्रिया करून घेण्याची जबाबदारी टाकतात.

पुन्हा प्रजननासाठी आवश्यक वाटल्यास कापून अलग केलेल्या नसा शस्त्रक्रियेने परत जुळवता येतात- त्यात 50 टक्के यशाची शक्यता असते.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday953
mod_vvisit_counterYesterday1224
mod_vvisit_counterThis week2177
mod_vvisit_counterLast week9370
mod_vvisit_counterThis month25172
mod_vvisit_counterLast month41767
mod_vvisit_counterAll days1734769

We have: 8 guests online
Your IP: 184.73.74.47
 , 
Today: मे 21, 2013