आरोग्यविद्या
Home भारतवैद्यक ते आरोग्यविद्या

भारतवैद्यक ते आरोग्यविद्या

आरोग्यविद्या ई-पुस्तकाची प्रस्तावना

आरोग्यविद्या हे ई-पुस्तक आमच्या भारतवैद्यक या पुस्तकावर आधारलेले आहे. मात्र त्यात पुष्कळ बदल केलेले आहेत. भारतवैद्यक हे पुस्तक मुख्यत: ग्रामीण कार्यकर्त्यांसाठी तयार केलेले होते. आत्ता महाराष्ट्र निम्मा ग्रामीण तर निम्मा शहरी आहे आणि आरोग्यक्षेत्रात बरेच बदल झालेले आहेत. तरीही ग्रामीण जनतेची गावपातळीवर प्राथमिक आरोग्यसेवेची गरज भागलेली नाही. आणि शहरातही अनेक वस्त्यांमध्ये प्राथमिक आरोग्यसेवा तुटपुंज्या आहेत. याशिवाय मध्यम वर्गीय कुटुंबानाही आरोग्याबद्दलची हवी ती माहिती सोप्या भाषेत लगेच मिळण्याची सोय नाही. तसेच शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये प्रशिक्षण केंद्रे स्वयंसेवी संस्था, शासकीय आरोग्य केंद्रे आणि घराघरांमध्ये अशा ई-पुस्तकाची सदैव गरज असते. आरोग्य, वैद्यकीय माहितीच्या प्रसारामुळे एकूण आरोग्य आणि आरोग्य व्यवस्था सुधारतात, आजारांचा प्रतिबंध होऊ शकतो, बराच वेळ व खर्च वाचतो आणि ग्राहक हक्कांचे संरक्षण होऊ शकते. म्हणूनच आरोग्य साक्षरतेला आतोनात महत्त्व आहे.

 

स्वातंत्र्यपूर्व प्रयत्न..

खेडोपाडी वैद्यकसेवा मिळण्यासाठी 1932 साली लिहिलेल्या एका पुस्तकाच्या (सिध्दौषधिप्रकाश - लेखक कै.वैद्य श्री. गणेशशास्त्री जोशी) दुस-या आवृत्तीच्या प्रस्तावनेला (1953) हा मजकूर अगदी बोलका आहे.असे अभ्यासक्रम चालवले जावेत ही महात्मा गांधींची इच्छाही यात दिसते. मात्र आज 1992 सलातही अशी सार्वत्रिक व्यवस्था नाही हे दु:खद सत्य आहे

सिध्दौषधिप्रकाश या पुस्तकाचा सर्वात अधिक गौरव महात्मा गांधी यांनी केला. प्रथम एक प्रत महात्मा गांधी यांना भेट म्हणून पाठविली. पुस्तक पाठविल्यानंतर सुमारे एक महिन्याने त्यांचे सेक्रेटरी कै. महादेव भाई देसाईंचे पत्र आले. त्यात त्यांनी लिहिले की, तुमचे पुस्तक महात्माजींनी वाचले, तुम्ही ज्या उद्देशाने हे पुस्तक लिहिले, तो उद्देश सफल झाला आहे. महात्माजींची अशी इच्छा आहे की, खेडेगावांत नेहमी आढळणारे विकार लक्षात घेऊन त्यांवरील उपचार लिहिलेले लहान पुस्तक सुमारे आठ आणे किंमतीचे छापावे. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी आणखी तीन प्रती मागविल्या. त्यांचेजवळ नेहमी असलेल्या पुस्तकांत हे पुस्तक असे. चाळीस सालचे चळवळीपासून त्यांचा वेळ तुरुंगातच

 

श्री. शरद जोशी यांची प्रस्तावना...

माझे मित्र डॉ. शाम अष्टेकर यांनी 'वैद्यक'तज्ज्ञाबरोबर 'भारत' तज्ज्ञाकडून प्रस्तावना घेण्याचे ठरवले त्यात त्यांचा काही उद्देश असावा.

भारतवैद्यक या कल्पनेचा जन्म झाला काही वर्षांपूर्वी पुण्याला भरलेल्या ग्रामीण भागात सेवाभावी काम करणा-या एका डॉक्टर मंडळींच्या बैठकीत. जन्माच्या वेळी मी हजर होतो. आणि बारशालाही हजर होतो.

शेतकरी संघटनेचा रास्त भावाचा एककलमी कार्यक्रम राबवण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न करत असतो. विपर्यस्त वाटावा इतका एकांगीपणा पत्करूनही मी हे व्र्रत चालवतो. आणि तरीही वैद्यकविषयावरच्या एका पुस्तकावर आज लिहायला बसलो आहे. खेडोपाडी जाऊन गावातील समाजजीवनाच्या विविध अंगांनी काम करणाऱ्यांना हा एकांगीपणा विशेष जाणवतो. राजकीय पक्षांच्या नेत्यांनसुध्दा नुसत्या शेतीमालाच्या भावाने काय होणार, गावांना रस्ते, पाणी, वीज, सफाई, शिक्षण, आरोग्यसेवा या सगळया सुविधा पुरवल्या पाहिजेत असे वाटत असते किंवा निदान त्यांचा कार्यक्रम असा असतो.

 

डॉ. अनंत रा.सी. फडके यांची प्रस्तावना...

डॉ. अष्टेकरांच्या या जाडसर, समग्र मराठी वैद्यकीय ग्रंथाचे प्रयोजन काय असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहील. आपल्या ग्रामीण भागातील आरोग्याची व वैद्यकीय सेवेची स्थिती लक्षात घेतली तर या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आकाराने व लोकसंख्येने अधिक्यानेअसलेला कोरडवाहू ग्रामीण भाग हा आपल्या देशातील सर्वात जास्त मागास व दारिद्रयग्रस्त आहे. पाणी, संडास, सांडपाण्याचा निचरा इ. स्वच्छतेच्या सोयीही या भागात अभावानेच आढळतात. त्यामुळे या गरीब, कुपोषित जनतेत आजारांचे प्रमाण जास्त आहे. योग्य दर्जाच्या, उपचारात्मक व रोगप्रतिबंधक सेवा मात्र फारच तुटपुंज्या आहेत. शहरापासून वीस-पंचवीस किलोमीटर गेले की चांगल्या वैद्यकीय सेवा दुर्लभ होऊ लागतात. या सर्व परिस्थितीचा परिणा म्हणजे अशा ग्रामीण भागात विशेषत: बालमृत्यूचे प्रमाण शहरी भागापेक्षा जास्त आहे. तसेच सर्वसामान्य ग्रामीण जनता, विशेषत: स्त्रिया, आजारी पडल्यावर अंगावर दुखणी काढत दिवस काढतात. एकविसाव्या शतकाकडे झेप घेऊ बघणा-या  आधुनिक भारताच्या दृष्टीने लांछनास्पद असलेली ही परिस्थिती बदलण्यासाठी मुळात दारिद्रयनिर्मूलन, सर्वांगीण सामाजिक सुधारणा याची तर आवश्यकता आहेत. पण जोपर्यंत आजार आहेत तोपर्यंत आजारांवर शक्यतो मोफत वा किमान रास्त दरात चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध होणेही आवश्यक आहे. नेमका हा दुसरा भाग सरकारी धोरणांमध्ये डावलला गेलेला आहे. पहिल्या भागाच्या बाबतीतही आर्थिक, सामाजिक परिवर्तनाच्या बाबतीत सर्वसामान्य कोरडवाहू ग्रामीण जनतेच्या दृष्टीने काही प्रगती झालेली नाही.

 

डॉ. दयानंद डोणगांवकर प्रस्तावना...

डॉ. शाम अष्टेकर यांच्या भारतवैद्यक या ग्रंथरुपी पुस्तकाची दहा वर्षांच्या आत  तिसरी आवृत्ती निघत आहे. यातच लेखकाचा हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू सफल झाला आहेअसे मला वाटते.

डॉ. अष्टेकरांनी व्यावसायिक शिक्षणानंतर ग्रामीण भागात व्यवसाय करून प्रथम स्वत:ला व्यावसायिक दृष्टया संपन्न बनवले. या अनुभवाच्या बळावर सामाजिक बांधिलकीने त्यांनी ग्रामीण आरोग्याच्या प्रश्नाबद्दल धोरणात्मक मार्ग शोधण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आरोग्याशी निगडित ग्रामीण भागातील वैयक्तिक आरोग्यातून परिसर स्वच्छतेपर्यंत सर्वच बाबींची अभ्यासपूर्ण माहिती संकलित केली आहे व ती अतिशय सोप्या भाषेत सामान्यांना समजेल अशा पध्दतीने मांडली आहे. ही माहिती जशी सामान्यांना उपयोगी आहे तेवढीच ती व्यावसायिकांना उपयुक्त अशी आहे, हे अवघड काम त्यांनी अतिशय यशस्वीपणे हाताळले आहे.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1014
mod_vvisit_counterYesterday1315
mod_vvisit_counterThis week7785
mod_vvisit_counterLast week13888
mod_vvisit_counterThis month34149
mod_vvisit_counterLast month46518
mod_vvisit_counterAll days4202329

We have: 21 guests, 1 bots online
Your IP: 106.79.83.98
Safari 534.30, Linux
Today: जुलै 21, 2017
Bharatswasthya