आरोग्यविद्या
Home अर्पण प्रत्रिका

अर्पण प्रत्रिका

अर्पण

'चांगली कामे करीत शंभर वर्षे जगण्याची हौस धर'.
हे आरोग्यसूत्र ईशावास्याच्या ऋषीने हजारो वर्षांपूर्वी सांगितले.

इसवी सन दोन हजार येईल-जाईल
, नवे शतकही येईल.

देशाचा एक हिस्सा तरी नवशतकात अधिकाराने प्रवेश करील.

स्कायस्क्रॅपर्स
, सायबरस्पेस, मुक्त-अर्थव्यवस्था, व्यक्तिस्वातंत्र्य, इ.

त्याच वेळी दुसरा हिस्सा-दुसरा देशच जणू-इडापीडांशी झगडत असेल
,

पडकी घरे
, फुफाटा, कशाबशा शाळा, सांडपाण्याची डबकी, उघडया हागंदा-या,

अस्मानी-सुलतानीच्या फे-यात शेतकरी
, पण राजकरणी गुंडांच्या ताब्यात सर्व जातिबध्द.
एकविसाव्या शतकात जाऊ पहाणाऱ्यांना शेष भारताचा रामराम. भेटू कधीतरी.

 ज्या 'भारतात' अजूनही
शेकडा सत्तर माऊल्या फक्त शेजारणीच्या भरवशावर बाळंतवेणा सोसतात
,

त्याही बहुतेक रात्रीच्या अंधारात
, आषाढ-श्रावणाच्या पाऊसपाण्यात, विजेच्या लपंडावात,

शेकडा पासष्ट बाळे
, अर्धपोटी खुरटलेली, दीनवाणी जगतात.

शेकडा बहुतेक दुखणाईत औषध म्हणून पाणी टोचून घेतात
,

त्यासाठी घामाचा दाम मोजतात
, प्रसंगी बैल बक-या  विकतात, कर्जे काढतात.

इथे थंडीताप असो
, ओटीपोटात दुखणे असो, की पोटात बैलाचे शिंग घुसो,

रानावस्तीतून फाटयापर्यंत
, फाटयापासून तालुक्यापर्यंत, तिथून आणखी कुठपर्यंतही

वणवण केल्याशिवाय इलाज नाही
, दम असेतोपर्यंत.

वणवण करूनही खरा विद्यावान
, दयावान डॉक्टर भेटेल, याचा भरवसा नाही.
दुखण्याची सुटी, रजा, वेतन, विमा, सवलत वगैरे सोडा; दयेचा शब्दही दुर्मीळ आहे.
आकडे-सरासरीच्या खेळात इथले दु:ख मावणे कठीण आहे.

अशा लाखो- करोडो मायबाप
, भाऊबहिणी, पोराबाळांना, आजच्या-उद्याच्या नागरिकांना,

एकविसाव्या शतकात
, निदान या महाराष्ट्रातल्या गावागावांत

प्राथमिक का म्हणाना
, पण शास्त्रीय वैद्यकसेवा मिळावी, म्हणून, तसेच

अशा लाखोकरोडोंना सुचेल तसा बरावाईट सल्ला-इलाज करणा-या
 हजारो प्रामाणिक विद्यार्थी

भारतवैद्यांना आणि जिज्ञासूंना

साध्या सोप्या मराठीत थोडी तरी शास्त्र-विद्या समजावी
, म्हणून

हे
'भारतवैद्यक' अर्पण.

 

 

 

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1682
mod_vvisit_counterYesterday2864
mod_vvisit_counterThis week1682
mod_vvisit_counterLast week12883
mod_vvisit_counterThis month31147
mod_vvisit_counterLast month52342
mod_vvisit_counterAll days4601845

We have: 19 guests, 3 bots online
Your IP: 49.35.247.30
Chrome 50.0.2661.89, Linux
Today: फेब्रु 18, 2018
Bharatswasthya