आरोग्यविद्या
Home लेखकाची भूमिका

लेखकाची परिचय व भूमिका


डॉ. रत्ना पाटणकर अष्टेकर (सहलेखिका)

(16.02.1958)
बी.जे मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. आणि नंतर बालरोग शाखेत डिप्लोमा.
1988 पासून दिंडोरी येथे ग्रामीण रुग्णालय चालवित आहे.
या पुस्तकातील आजारांसंबंधीची माहिती
, फ्लोचार्ट, औषधे इ. बद्दल महत्त्वाचे योगदान.
दूरध्वनी
02557 - 221143/48
भ्रमणध्वनी -
9422943898
email - हा ई-मेल स्पँमबॉट्स पासुन् सुरक्षित आहे. हा बघण्यासाठि जावास्क्रिप्ट सक्रिय करा.

 

 

लेखक परिचय
डॉ. शाम विनायक अष्टेकर
(29.03.54)

शिक्षण
एम्.बी.बी.एस.
1977
बी.जे मेडिकल कॉलेज
, पुणे.
एम.डी. (सामाजिक व रोगप्रतिबंधक वैद्यकशास्त्र)
1986
बी.जे. मेडिकल कॉलेज
, पुणे.

अभ्यास

1) 'वचन' संस्था, नाशिक यांच्या 35 आरोग्यरक्षकांच्या कामाचा अभ्यास - अहवाल.
(Knowing Health Workers)

2) चीन व फिलिपाईन्स देशांतील आरोग्य-व्यवस्थांचा प्रत्यक्ष अभ्यास.

3) इंग्लंड, जर्मनी, अमेरिका या देशांच्या आरोग्यव्यवस्थांचा अभ्यासदौरा.
4) मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील ग्रामीण आरोग्य सेवांचा अभ्यास.
5) नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण डॉक्टर्सचा अभ्यास. (2001)

लेखन

या पुस्तकाशिवाय विविध इंग्रजी-मराठी दैनिकांमधून व नियतकालिकांमधून आरोग्यविषयक लेखन.
सार्वजनिक आरोग्यविषयक स्तंभलेखन
, एम्.एफ.सी बुलेटिनचे दोन वर्षे संपादन.
नॅशनल बुक ट्रस्टच्या स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णमहोत्सवी विशेष मालिकेत
'सर्वांसाठी आरोग्य' या पुस्तिकेचे लेखन.
केंद्र सरकारच्या
'आशा' योजनेसाठी अध्ययन साहित्य.
मूक्त विद्यापीठाच्या
'आरोग्यमित्र' शिक्षणक्रमासाठी पुस्तके.

 

लेखकाची भूमिका..

1979-80 या काळात श्री. शदर जोशींबरोबर चाकणच्या भामनहर खो-या त फिरताना वैद्यकीय सेवेची परवड पाहून गावागावात किमान आरोग्यरक्षकाची तरी सोय अनिवार्य आहे असे मला पहिल्यांदा प्रखरपणे जाणवले. त्या काळी इतर अनेक ठिकाणक्ष आरोग्यरक्षक प्रकल्प चालू होते याची मला व्यक्तिश: फारशी जाणीव नव्हती. प्राथमिक आरोग्य केंद्राचा डॉक्टर म्हणून काम करताना भामनहर खो-या त आम्ही ही 'अनवाणी डॉक्टर'ची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला. आज मागे वळून पाहताना त्या कामातले अपुरेपण जाणवते. पण त्यातला अनुभव मोलाचा होता. एकदा भामनहर खो-या तले गडद गावचे श्री. गबाजी शिंदे हे आरोग्यरक्षक भर पावसाळयात, केवळ मलेरियाच्या गोळया संपल्या म्हणून पस्तीस किलोमीटर चालून भल्या पहाटे चाकणला आले आणि गोळया घेऊन तसेच चालत परत गेले. हा अनुभव मला आजही विदारक वाटतो. वर्षा-दीडवर्षापूर्वी इगतपुरी तालुक्यातल्या एका पाडयावर मी असेच काही भयानक पाहिले. काही कारणाने डोळे गेलेल्या एका ओल्या बाळंतिणीच्या मांडीवर डोळे येऊन नुकतेच आंधळे झालेले बाळ होते. या टोकाच्या गोष्टी अपवाद म्हणून सोडल्या तरी गावागावात आज विसंबून राहावी अशी कसलीच व्यवस्था नाही हे नजरेआड करता येणार नाही.

खरे तर राज्यघटनेनेही आरोग्यसेवा हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे असे मानलेले नाही, पण तसे मानले असते तरी विशेष उपयोग झाला असता असे आज वाटत नाही. 'कल्याणकारी' धोरणाच्या मोघम पायावर, नियोजन व्यवस्थेच्या चौकटीत, वरून जेवढे द्यायचे ठरलेले असते तेही पुरेपूर पदरात टाकले जात नाही. अमूक इतकी किमान वैद्यकसेवा दिलीच पाहिजे अशी जनतेने सांगण्याची आणि कोणी ते ऐकून घेण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. लोकांना केवळ लोकसंख्या समजून त्यांचे नियंत्रण करणे, समुचित आरोग्य-वैद्यकसोयींच्या नावाखाली कम अस्सल प्रतिबंधक सेवा देणे आणि 'उपचारांपेक्षा प्रतिबंध बरा' अशी घोषणा देऊन 'उपचारांऐवजी जुजबी प्रतिबंधक उपाय करणे' ही आजच्या शासकीय ग्रामीण आरोग्यसेवेची प्रमुख वैशिष्टये आहेत. साहजिकच उपलब्ध असलेल्या बहुश: शोषक, बाजारू आणि निरंकुश खाजगी वैद्यकव्यवसायावरच ग्रामीण जनतेला अवलंबून राहावे लागते.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday913
mod_vvisit_counterYesterday1940
mod_vvisit_counterThis week2853
mod_vvisit_counterLast week12883
mod_vvisit_counterThis month32318
mod_vvisit_counterLast month52342
mod_vvisit_counterAll days4603016

We have: 33 guests, 2 bots online
Your IP: 54.167.29.208
 , 
Today: फेब्रु 19, 2018
Bharatswasthya