आरोग्यविद्या
Home आधुनिक पोषणशास्त्र

आधुनिक पोषणशास्त्र

प्रास्ताविक

पोषण हा वैद्यकीय शास्त्रातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शरीराची वाढ आणि रोगप्रतिकारशक्ती योग्य पोषणावरच अवलंबून असतात.

कुपोषणाचे प्रत्यक्ष आजार म्हणजे निरनिराळया अन्नघटकांच्या अभावाने तयार झालेले विविध आजार (उदा. रातांधळेपणा, अंधत्त्व, सर्वांगसूज, रोडपणा, मुडदूस, रक्तपांढरी, इ.).

तसेच कुपोषणामुळे अप्रत्यक्ष आजार म्हणजे  रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने विविध आजार होतात. (उदा.अनेक प्रकारचे जंतुदोष).

कुपोषणाचे मुख्य दोन प्रकार म्हणजे (अ) एकूण अन्न कमी पडणे किंवा (ब) विशिष्ट अन्नघटक कमी पडणे. या दोन्ही समस्या समजण्यासाठी आधी पोषणाची मूलतत्त्वे समजावून घेणे आवश्यक आहे.

कुपोषणाचा प्रश्न हा केवळ माहितीच्या अभावाचा किंवा अज्ञानाचा नसून मुख्यतः गरिबीचा आहे. पण श्रीमंत कुटुंबातही कमी जास्त कुपोषण आढळते. त्यासाठी आहारशास्त्राची माहिती आवश्यक आहे.

  पोषणाचे शास्त्र तसे समजायला सोपे आहे. या प्रकरणात आपल्याला  शिकायचे आहे:

आपण रोज खातो त्या पदार्थात काय व किती प्रमाणात अन्नघटक असतात.

-  शरीराची गरज किती असते आणि

-  पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी काय काळजी घ्यावी.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday886
mod_vvisit_counterYesterday2307
mod_vvisit_counterThis week11416
mod_vvisit_counterLast week15782
mod_vvisit_counterThis month51293
mod_vvisit_counterLast month59375
mod_vvisit_counterAll days4428449

We have: 17 guests online
Your IP: 66.249.64.8
Googlebot 2.1, 
Today: नोव्हेंबर 24, 2017
Bharatswasthya