आरोग्यविद्या
Home डोळ्याचे आजार

डोळ्याचे आजार

 

डोळा हा प्रकाशाचा आणि ज्ञानाचा रस्ता आहे. मानवी विकासात डोळयाचे अपरंपार महत्त्व आहे. अंधत्व हा मानवी विकासातला मोठा अडसर आहे. आपल्या देशात अंधत्वाचे प्रमाण खूप (सुमारे 1%) आहे. अंधत्वाची आपल्या देशातील प्रमुख कारणे म्हणजे कुपोषण ('' जीवनसत्त्वाचा अभाव), खुप-या रोग, मोतीबिंदू व काचबिंदू ही आहेत. यांपैकी पहिली दोन कारणे टाळण्यासारखी आहेत. मोतीबिंदूवर सोप्या शस्त्रक्रियेचा उपाय आहे. मात्र कुपोषण, खुप-यांमुळे आलेल्या अंधत्वावर बुबुळ-कलम शस्त्रक्रिया करावी लागते. डोळयांचे इतर आजार म्हणजे रांजणवाडी, दृष्टीदोष, डोळे येणे, जखमा,, इत्यादी. यांपैकी काही आजार काळजीपूर्वक प्राथमिक उपचार करून बरे करता येतात. राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमांतून अंधत्वाचे प्रमाण निम्म्याने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. भारतात अंधत्वाच्या आजारांचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे.


मोतीबिंदू (
62%)

दृष्टीदोष (लघुदृष्टी,दीर्घदृष्टी) -20%

काचबिंदू- 6%

डोळयांच्या आतील आजार- 5%

बुबुळ-फूल-1%

इतर- 6%

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday252
mod_vvisit_counterYesterday1940
mod_vvisit_counterThis week2192
mod_vvisit_counterLast week12883
mod_vvisit_counterThis month31657
mod_vvisit_counterLast month52342
mod_vvisit_counterAll days4602355

We have: 11 guests online
Your IP: 157.55.39.77
Iphone , Mac
Today: फेब्रु 19, 2018
Bharatswasthya