आरोग्यविद्या
Home तोंड व दातांचे आरोग्य

तोंड व दातांचे आरोग्य

 

तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. त्यातूनच जंतूंचाही प्रवेश होतो. तोंडाचे आरोग्य हे एकूण आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचे आहे. दात, हिरडया, तोंड यांसाठी खास वैद्यकीय शाखा त्यामुळेच आहे. आपणही यातल्या काही प्राथमिक गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत.

आजुबाजूच्या व्यक्तींकडे बारकाईने लक्ष दिल्यास दात-तोंडाच्या अनेक आजारांशी आपली सहज ओळख होईल. खराब झालेले दात, किडलेले दात, दातावरचे कीटण, सुजलेल्या हिरडया, हिरडयांची झिजून उघडी झालेली दातांची मुळे वगैरे अनेक विकार पाहायला मिळतात. मुलांना देखील दातांचे अनेक आजार असतात. मागच्या पिढीच्या लोकांमध्ये दात-हिरडयांचे आजार मोठया प्रमाणात होते. अनेकांचे साठीच्या आधीच दात पडलेले असायचे. आताच्या पिढीत दात जास्त वर्षे शाबूत राहतात. याचे मुख्य कारण दातांचा ब्रश. ब्रशमुळे दात साफ राहतात, कमी आजार होतात आणि दात जास्त टिकतात.

दाताचा डॉक्टर नसल्यास काही साधी दंतवैद्यकीय तंत्रे शिकून आपण बरेच काम करू शकतो.

- दातांची, हिरडयांची तपासणी

- दातांची निगा कशी ठेवायची ते सर्वांना शिकवणे

- किडलेल्या दातात सिमेंट भरणे

- कीटण काढणे

- खूप हलणारा दात काढणे

- वृध्द माणसांना कवळी बसवून घ्यायला प्रवृत्त करणे

ही कामे अगदी महत्त्वाची आहेत. आपल्यालाही ती नक्की करता येतील, फक्त त्यासाठी थोडे प्रशिक्षण पाहिजे. या प्रकरणात या कामांसाठी लागणारी माहिती आपण बघू या.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1184
mod_vvisit_counterYesterday1315
mod_vvisit_counterThis week7955
mod_vvisit_counterLast week13888
mod_vvisit_counterThis month34319
mod_vvisit_counterLast month46518
mod_vvisit_counterAll days4202499

We have: 28 guests online
Your IP: 207.46.13.53
Mozilla 5.0, 
Today: जुलै 21, 2017
Bharatswasthya