आरोग्यविद्या
Home त्वचाविकार

त्वचाविकार

त्वचा म्हणजे बोली भाषेत चामडी किंवा कातडी. 'रोग कसे होतात' या प्रकरणातील तक्त्यात आपण त्वचेच्या सदरात पाहिलेच असेल. भारतात बहुतेक त्वचेचे आजार हे सूक्ष्म जीवजंतूंमुळे होतात. खरूज, गजकर्ण, गळवे, पुरळ, कुष्ठरोग, हे सर्व या गटात मोडतात. बरेच आजार सांसर्गिक आहेत आणि ते निकृष्ट राहणीमानाने, अपु-या स्वच्छतेमुळे वाढतात. या आजारांवरचा खरा उपाय राहणीमान आणि स्वच्छता सुधारणे हाच आहे. त्वचेच्या लिंगसांसर्गिक आजारांची माहिती स्वतंत्र प्रकरणात दिली आहे.

त्वचेच्या आजारांचे प्रमाण बरेच असल्याने त्वचारोगासंबंधी माहिती असणे आवश्यक आहे. योग्य रोगनिदान झाले तर औषधोपचाराने चांगला उपयोग होऊ शकतो. पण योग्य माहिती नसल्याने निरर्थक व हानिकारक औषधोपचार करण्याचेही प्रमाण खूप आहे. त्वचारोगांबद्दल अज्ञान व भीती खूप असल्याने फसवेगिरीही फार आढळते. तसेच 'स्टेरॉईड' या औषधांचा गैरवापर त्वचारोगांमध्ये अनेक वेळा होतो. या औषधांमुळे काही आजारांत चटकन आराम मिळाला तरी तो तात्पुरता असतो. त्यानंतर दुखणे बहुधा उलटते व रुग्णाला विनाकारण त्रास भोगावा लागतो. या प्रकरणातील माहिती वाचून नेहमी आढळणा-या बहुतेक त्वचारोगांचे प्राथमिक निदान व उपचार करता येतील.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1762
mod_vvisit_counterYesterday1899
mod_vvisit_counterThis week12074
mod_vvisit_counterLast week11187
mod_vvisit_counterThis month36860
mod_vvisit_counterLast month48866
mod_vvisit_counterAll days4304341

We have: 17 guests, 1 bots online
Your IP: 2405:204:9023:85f9:4680:1150:5816:1953
Chrome 59.0.3071.125, Linux
Today: सप्टेंबर 23, 2017
Bharatswasthya