आरोग्यविद्या
Home रक्तसंस्थेचे आजार

रक्तसंस्थेचे आजार

 

रक्तपांढरी (ऍनिमिया)

रक्तपांढरी म्हणजे रक्तद्रव्याचे प्रमाण कमी होण्याला आपण दिलेले एक सोयीचे नाव आहे. किंवा 'रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता घटणे म्हणजे रक्तपांढरी'.

रक्तपांढरी हा आजार आपल्या देशातला एक प्रमुख आजार आहे. तो इतक्या प्रमाणात आढळतो, की ब-याच लोकांना याची 'सवय' होते. इतर काही आजार असल्याशिवाय तक्रार करावी असे वाटत नाही. रक्तपांढरी जास्त प्रमाणात असेल तरच औषधोपचाराचा विचार केला जातो. रक्तपांढरी हा इतका सामान्य रोग असला तरी त्यासाठी लोकभाषेत कोठलेही नाव प्रचलित नाही. रक्तक्षय हा तयार केलेला संस्कृत शब्द आहे. रक्तक्षय हे नाव 'क्षय' या घटकामुळे गैरसमज करून देणारे आहे. सर्वसाधारणपणे ग्रामीण जनतेत, विशेषतः स्त्रियांमध्ये, याचे प्रमाण 50-70 टक्के आढळते. पाच वर्षापेक्षा लहान मुलांमध्येही तेवढेच प्रमाण आहे. हा जास्त करून गरिबीचा आणि कुपोषणाचा आजार आहे. पण हा आजार आपल्या देशात श्रीमंतांनाही होतो.

रक्तपांढरी म्हणजे काय?

आपल्या रक्तात हिमोग्लोबीन - हे लाल रक्तद्रव्य असते आपल्या रक्तात रक्तद्रव्याचे प्रमाण दर 100 मिली. मध्ये सुमारे 15 ग्रॅम इतके (तक्ता पाहा) असायला पाहिजे. हे रक्तद्रव्य तांबडया पेशींमध्ये भरलेले असते. या तांबडया पेशी हाडांच्या पोकळयांमध्ये तयार होतात. रक्तपेशी सुमारे 120 दिवस रक्तात राहतात. त्यानंतर पांथरीमध्ये त्या 'मोडीत' निघतात. त्यातून निघालेल्या रक्तद्रव्याचे विघटन होऊन प्रथिने, लोह, इत्यादी घटक वेगवेगळे होतात. काही भाग परत वापरण्यासारखा नसतो, तो लघवीवाटे व मळावाटे बाहेर टाकला जातो. हा बाहेर टाकला जाणारा पदार्थ पिवळा असतो. म्हणूनच लघवी व मळ पिवळसर असतात. काविळीचा पिवळा रंगही याच द्रव्याचा असतो. उरलेल्या घटकांपैकी लोह व प्रथिने परत नवीन रक्तपेशी करण्यासाठी वापरले जातात.

रक्तपांढरीची कारणे

रक्तपांढरीत रक्तातील रक्तद्रव्याचे एकूण प्रमाण कमी असते. रक्तपांढरीचे दोन मुख्य प्रकार आहेत. (अ) रक्तपेशींची संख्या व प्रमाण कमी असणे किंवा (ब) पेशीतल्या रक्तद्रव्याचे प्रमाणच कमी असणे हेच जास्त महत्त्वाचे कारण आहे.

रक्तद्रव्याचे प्रमाण : ग्रॅम 100 मिली. ( तक्ता (Table) पहा)

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1001
mod_vvisit_counterYesterday1919
mod_vvisit_counterThis week5592
mod_vvisit_counterLast week11187
mod_vvisit_counterThis month30378
mod_vvisit_counterLast month48866
mod_vvisit_counterAll days4297859

We have: 10 guests, 1 bots online
Your IP: 49.35.13.193
Chrome 39.0.2171.93, Linux
Today: सप्टेंबर 20, 2017
Bharatswasthya