आरोग्यविद्या
Home श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार

श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार

प्रास्ताविक

श्वसनसंस्थेचे अनेक प्रकारचे आजार हे नेहमी आढळतात. पचनसंस्थेप्रमाणेच श्वसनसंस्थाही सतत बाहेरचे पदार्थ (हवा, धूळ, इ.) आत घेते. त्यामुळे संसर्गाचे अनेक प्रकारचे आजार श्वसनसंस्थेशी संबंधित आहेत. भारतात तर न्यूमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पचनसंस्थेचे अनेक आजार शुध्द अन्न-पाण्याने टळतात, पण श्वसनसंस्थेच्या बाबतीत प्रतिबंधक उपाय करणे कठीण आहे. इथे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगल्या पोषणाची गरज आहे कोंदटपणा व दाटीवाटीमुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. हे एक कारण राहणीमानाशी संबंधित आहे. हवाप्रदूषण हा तिसरा महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच श्वसनसंस्थेचे आजार हटवणे हे पचनसंस्थेच्या आजारांच्या मानाने जास्त कठीण आहे.

श्वसनसंस्थेच्या अनेक आजारात खोकला येतो. पण खोकला  हे केवळ लक्षण आहे हे नजरेआड करून खोकल्याच्या औषधांचा निरुपयोगी मारा केला जातो. श्वसनसंस्थेच्या आजारांबद्दल शिकताना ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday147
mod_vvisit_counterYesterday2463
mod_vvisit_counterThis week147
mod_vvisit_counterLast week12775
mod_vvisit_counterThis month37708
mod_vvisit_counterLast month48866
mod_vvisit_counterAll days4305189

We have: 17 guests online
Your IP: 54.198.58.62
 , 
Today: सप्टेंबर 24, 2017
Bharatswasthya