आरोग्यविद्या
Home गरोदरपणातली सामान्य काळजी

गरोदरपणातील सामान्य काळजी

 

प्रास्ताविक

गरोदरपण व बाळंतपण ह्या नैसर्गिक गोष्टी असल्या तरी या अवस्थांमध्ये अनेक प्रकारच्या लहान - मोठया तक्रारी व धोके संभवतात. गरोदरपण व बाळंतपण दोन्ही सुखरुप होणे, मुल निरोगी व सुरक्षित असणे, मातेचे आरोग्य सुरक्षित राहणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. निसर्गातील इतर प्राण्यांमध्ये गरोदरपण, बाळंतपण वगैरे गोष्टी सहज आणि निर्धोक घडत असतात असा एक समज आहे. मात्र प्राण्यांपेक्षा माणसाचे बाळंतपण काही प्रमाणात जास्त अवघड आहे. याचे एक प्रमुख कारण म्हणजे मानवी अर्भकाचे डोके शरीराच्या तुलनेने इतर प्राण्यांपेक्षा जास्त मोठे आहे. गरोदरपण आणि बाळंतपण (त्यानंतरचे सहा आठवडे) या घटनांशी संबंधित आजारांचे आणि माता मृत्यूंचे प्रमाण भारतात तुलनेने फारच जास्त आहे ( म्हणजे दर हजार बाळंतपणांत चार माता- मृत्यू).

आपल्या देशात ग्रामीण भागात निम्म्याहून अधिक बाळंतपणे घरी होतात. बरीच बाळंतपणे सुखरुप होत असली तरी काही बाबतींत धोके संभवतात. गरोदरपणात, बाळंतपणात काय काय काळजी घ्यायची असते, धोके कसे ओळखायचे याबद्दल आपण या प्रकरणात थोडक्यात पाहू या. मात्र गरोदरपण व बाळंतपण सुखरुप पार पाडण्यासाठी व त्यातले बारकावे समजण्यासाठी जास्त प्रशिक्षणाची (व त्यासाठी खास पुस्तकाची) गरज आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनमार्फत आता बाळंतपण रुग्णालयातच करावे असे प्रयत्न आहेत.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday2463
mod_vvisit_counterYesterday1899
mod_vvisit_counterThis week12775
mod_vvisit_counterLast week11187
mod_vvisit_counterThis month37561
mod_vvisit_counterLast month48866
mod_vvisit_counterAll days4305042

We have: 17 guests online
Your IP: 106.67.145.199
Chrome 60.0.3112.116, Linux
Today: सप्टेंबर 23, 2017
Bharatswasthya