आरोग्यविद्या
Home लैंगिक समस्या

लैंगिक समस्या

प्रास्ताविक

लैंगिक इच्छा व ऊर्जा हीच समस्त प्राणीवर्गाच्या अस्तित्वाचा उगम आहे. पण इतर प्राणी व मानव यांच्या लैंगिकतेत काही महत्त्वाचे फरक आहेत. एकतर प्राणीवर्गात लैंगिक प्रवृत्ती बहुशः ऋतुप्रमाणे कमी जास्त होते; मानवात ती सर्व ऋतूंमध्ये, कधीही जागृत होऊ  शकते. दुसरी गोष्ट म्हणजे प्राण्यांमध्ये लैंगिक जोडीदार निवडण्यात काही स्वातंत्र्य असते, मात्र लग्नसंस्थेमुळे मानवाने त्याबद्दल काही बंधने स्वीकारलेली आहेत. लग्नाची व्यवस्था नसती तर पशूंप्रमाणे 'बळी तो कान पिळी' हा न्याय लागू झाला असता. लग्नांचा तोटा म्हणजे काही जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या सहन करायला लागणे, आणि काहींना लैंगिक असमाधान. बलात्कार हा शाप बहुतेक मानव समाजामध्ये आहे, पशूंमध्ये तो नाही हाही फरक आहे.

अनेक लोक लैंगिक असमाधानाने त्रस्त असतात. यासाठी कोणी काही औषध सुचवले तर काहीही खर्च करायला तयार असतात. योग्य सल्ला उपचार मिळण्याची सर्वत्र सोय नसल्याने या क्षेत्रात फसवेगिरी पुष्कळ आहे. वर्तमानपत्रात अशा पुष्कळ जाहिराती नित्य आढळतात. या समस्यांबद्दल महत्त्वाची काही माहिती आपल्याला असायला हवी. या समस्यांपैकी लिंगसांसर्गिक आजारांचे प्रकरण पूर्वीच होऊन गेलेले आहे. या प्रकरणात इतर काही समस्या पाहूया.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1974
mod_vvisit_counterYesterday1930
mod_vvisit_counterThis week7454
mod_vvisit_counterLast week12883
mod_vvisit_counterThis month36919
mod_vvisit_counterLast month52342
mod_vvisit_counterAll days4607617

We have: 92 guests, 1 bots online
Your IP: 207.46.13.87
Iphone , Mac
Today: फेब्रु 21, 2018
Bharatswasthya