आरोग्यविद्या
Home राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

क्षयरोग

क्षयरोग हा विशिष्ट सूक्ष्म जंतूमुळे, म्हणजे जिवाणूंमुळे होणारा आजार आहे. क्षयरोग हा सामान्यपणे फुप्फुसाचा आजार असला तरी आतडी, त्वचा, रसग्रंथी, मेंदू, सांधे, हाडे, इत्यादी निरनिराळया अवयवांमध्ये तो होऊ शकतो. आपल्या देशात याचे प्रमाण फार म्हणजे हजारी 20 ते 30 इतके आहे. सर्व वयोगटांत हा आजार आढळतो. पण लहान मुलांमध्ये आणि मोठया माणसांत या रोगाचे वेगवेगळे रुप दिसते.

निकृष्ट राहणीमान हे क्षयरोगाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. इंग्लंड-युरोपमध्ये एकेकाळी मोठया प्रमाणावर होता. हा आजार तेथले राहणीमान सुधारताच खूपच कमी झाला. त्या वेळी क्षयरोगाची औषधे अजून निघायची होती. आपल्याकडे मात्र औषधे निघूनही क्षयरोगाचे प्रमाण खूप आहे. याचे कारण हेच, की गरिबीचा प्रश्न आपण सोडवू शकलो नाही. अपुरा आहार, अपुरी कोंदट घरे, गोठयासोबत राहणे, औषधपाण्याची सोय नाही अशा परिस्थितीत क्षयरोग टिकून आहे. रस्त्यावर व इतरत्र थुंकण्याची सवय अगदी वाईट खरी, पण हे क्षयरोगाचे मुख्य कारण नाही.

क्षयरोग हवेवाटे, श्वासावाटे पसरतो. तरी गरीब वस्त्यांमधून सर्रास आढळणारा क्षयरोग सुखवस्तू समाजात कमीच आढळतो. क्षयरोगाबरोबर लढाई करायची असेल तर सामाजिक, आर्थिक परिस्थिती आणि राहणीमान सुधारणे महत्त्वाचे आहे.

क्षयरोग हा सौम्य पण दीर्घ प्रकारचा दाह आहे. हा आजार महिनोनमहिने चालतो. यातही दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे लहान मुलांमध्ये होणारा क्षयरोग. दुसरा प्रौढ वयात येणारा क्षयरोग.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1634
mod_vvisit_counterYesterday1899
mod_vvisit_counterThis week11946
mod_vvisit_counterLast week11187
mod_vvisit_counterThis month36732
mod_vvisit_counterLast month48866
mod_vvisit_counterAll days4304213

We have: 18 guests, 1 bots online
Your IP: 106.193.211.0
Chrome 38.0.1025.166, Linux
Today: सप्टेंबर 23, 2017
Bharatswasthya