आरोग्यविद्या
Home समतोल आहार

समतोल आहार

समतोल आहाराच्या कल्पनेप्रमाणे जेवणात पिठूळ पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, क्षार, जीवनसत्त्वे या सर्वांचा पुरेसा समावेश असणे आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी या धान्यांबरोबर डाळी, शेंगदाणे, भाजीपाला, फळभाजी, फळे, तेल, तूप इतक्या गोष्टी आवश्यक असतात. हे पदार्थ अगदी रोज नाही तरी आठवडयातून दोन-तीन वेळेस अदलून बदलून मिळावेत. दूध हा तसा संपूर्ण पण महाग आहार आहे. दूध, शेंगदाणे, इत्यादींतून मिळणारी प्रथिने तुलनेने 'महाग' प्रथिने आहेत आणि ज्वारी, बाजरीतून मिळणारी प्रथिने स्वस्त आहेत. प्राणिज पदार्थ, मांस, मासे, अंडी ही महाग प्रथिने आहेत. त्यातल्या त्यात अंडे सर्वात स्वस्त व परिपूर्ण प्राणिज प्रथिन आहे.

चौरंगी आहार कल्पना

आहारशास्त्र सर्वांना सोपे करून सांगण्यासाठी चौरंगी आहार ही कल्पना चौरस आहार म्हणून सांगता येईल. चौरंगी म्हणजे चार रंग. पांढरा, पिवळा हिरवा, लाल. कोणत्याही जेवणात हे चार रंग असावे म्हणजे आहार चौरस होतो.

पांढरा - भात, कांदा, लसूण, अंडे, दूध, फ्लॉवर, कोबी

पिवळा - भाकरी, चपाती, वरण, पिवळी फळे, लिंबू, भोपळा, पेरु

हिरवा - हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या

लाल - फळभाज्या, (टोमॅटो), गाजर, मांस, मिरची

(यातील मांसाहारी पदार्थ ऐच्छिक आहेत) ही कल्पना वापरून आहारात समतोलता आणता येते.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday172
mod_vvisit_counterYesterday2286
mod_vvisit_counterThis week21974
mod_vvisit_counterLast week15769
mod_vvisit_counterThis month41448
mod_vvisit_counterLast month64227
mod_vvisit_counterAll days4484383

We have: 30 guests, 3 bots online
Your IP: 54.145.51.250
 , 
Today: डिसेंबर 16, 2017
Bharatswasthya