आरोग्यविद्या
Home निरनिराळया अन्नपदार्थांची पोषणमूल्ये

निरनिराळया अन्नपदार्थांची पोषणमूल्ये

आपल्या आहारात अनेक प्रकारचे अन्नपदार्थ असतात. यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे करता येईल:

प्राणिज पदार्थ : अंडी, दूध, मांस, मासे, इ.

-  वनस्पतीजन्य पदार्थ : निरनिराळी बीजे (ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, शेंगदाणे, इ.) यांत तृणधान्य व कडधान्ये येतात. हिरव्या पालेभाज्या, निरनिराळया फळभाज्या, (वांगी, टोमॅटो, इ.) खायची फळे, (आंबा, चिक्कू, इ.) कंद (कांदा, लसूण) निरनिराळी मुळे (गाजर), मसाल्याचे पदार्थ (मिरची, लवंग, दालचिनी, इ.) मध.

-  निरनिराळी खनिजे व क्षार : मीठ, चुना.

-  वनस्पतींपासून बनलेले पदार्थ : गूळ , साखर.

बहुतेक पदार्थात निरनिराळया अन्नघटकांची सरमिसळ असते. उदा .  तांदळात मुख्यतः पिठूळ पदार्थ, सुमारे सात टक्के प्रथिने आणि  काही  जीवनसत्त्वे असतात. मांसामध्ये प्रथिने , चरबी, ब-अ जीवनसत्त्वे, लोह, चुना, इ. घटक असतात. दुधामध्ये पाणी, प्रथिने, साखर, चरबी, (स्निग्ध पदार्थ), खनिजे, (चुना) जीवनसत्त्वे, इत्यादी बहुतेक सर्व घटक असतात.

या दृष्टीने पाहिल्यास काही पदार्थ विशेष पोषक असल्याचे लक्षात येईल. दूध, प्राणिज पदार्थ, कडधान्ये तेलबिया (उदा. शेंगदाणे, सोयाबीन), कठीण कवचाची फळे, यांत प्रथिने जास्त असतात. तांदूळ, गहू वगैरे धान्यांत पिठूळ पदार्थ जास्त असतात. प्रथिनयुक्त पोषक पदार्थ योग्य प्रमाणात  मिळावेत म्हणजे शरीराला प्रथिनांची कमतरता जाणवणार नाही. निरनिराळया डाळींमध्येही प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. म्हणून जेवणातले  डाळींचे प्रमाण चांगले असावे. तरीही आहारात प्रथिनांचा पुरवठा मुख्यत: तृणधान्यातूनच होत असतो, कारण आपल्या आहारात मुख्य वाटा या धान्यांचाच असतो.

तृणधान्ये (ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, नाचणी, इ.) व कडधान्ये (डाळी, इ.) सोडल्यास बाकीच्या अनेक पदार्थांचा वाटा साहाय्यक म्हणून आहे. म्हणजे ते तृणधान्यांबरोबर खाल्ले जातात. यांत मुख्यतः फळभाज्या आणि पालेभाज्या येतात. उष्मांक आणि प्रथिनांच्या भाषेत यांना फारसे मूल्य नसले तरी जीवनसत्त्वे, क्षार यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. भाज्यांमुळे जेवणाची चव सुधारते (तृष्टी). भाज्यांमधला चोथा मलविसर्जनासाठी फार महत्त्वाचा असतो. कोंडयातही चोथा असतो. हा सर्व चोथा पचनसंस्थेच्या कामामध्ये आवश्यक असतो.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday164
mod_vvisit_counterYesterday2286
mod_vvisit_counterThis week21966
mod_vvisit_counterLast week15769
mod_vvisit_counterThis month41440
mod_vvisit_counterLast month64227
mod_vvisit_counterAll days4484375

We have: 28 guests, 2 bots online
Your IP: 54.145.51.250
 , 
Today: डिसेंबर 16, 2017
Bharatswasthya