आरोग्यविद्या
Home रोगनिदानाच्या पाय-या

रोगनिदानाच्या पाय-या

कोठलेही उपचार करण्याआधी त्या रुग्णाला काय 'आजार' झाला आहे हे ठरवावे लागते. आजार निश्चित करण्याच्या (रोगनिदान) निरनिराळया शास्त्रांत निरनिराळया पध्दती आहेत. आयुर्वेदामध्ये रोगनिदानात कफ, वात, पित्त, नाडी, इत्यादी महत्त्वाचे असते. होमिओपथीमध्ये लक्षणे महत्त्वाची असतात. आधुनिक वैद्यकात रोगाची लक्षणे, पूर्वेतिहास आणि निरनिराळी चिन्हे लक्षात घेऊन निदान केले जाते. यातून निदान न झाल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास खास तपासणी (उदा.रक्त,लघवी,क्ष-किरण तपासणी वगैरे) केली जाते. आधुनिक रोगनिदानामध्ये तीन महत्त्वाच्या पाय-या आहेत.

रोगलक्षणांची माहिती, पूर्वेतिहास व आनुषंगिक माहिती.

-  शारीरिक तपासणी : निरनिराळी चिन्हे (नाडी, श्वास, तापमान, इ.)

-  खास तपासणी (उदा. रक्त,लघवी, थुंकी तपासणे, क्ष-किरण तपासणी, इ.) बहुतेक आजार रोगलक्षणे व रोगचिन्हे यांवरून ओळखता येतात. खास तपासणीच्या तंत्रांची काही माहिती स्वतंत्र प्रकरणात दिली आहे.

उदाहरण द्यायचे झाल्यास छातीच्या क्षयरोगात खोकला, ताप ही लक्षणे असतात. वैद्यकीय तपासणीत फुप्फुसात सूज आढळणे, बेडक्यात रक्त-पू पडणे, वजन घट ही चिन्हे म्हणता येतील. शेवटी बेडका तपासणीत क्षयरोग जंतू सापडणे व क्ष-किरण चित्रात क्षयरोगाचा डाग आढळणे ही झाली विशेष तपासणी.

संस्था, आजार, लक्षणे आणि चिन्हे

रोगलक्षणांच्या चिन्हांची संख्या खूप आहे. काही लक्षणे अगदी एकेका अवयवांशी निगडित असतात. (उदा. दातदुखी, कान फुटणे, इ.), तर काही लक्षणांचा संबंध अनेक संस्थांशी येतो (उदा. ताप, उलटी, इ.). म्हणूनच चिन्ह-लक्षणांवरून रोगनिदान करणे आवश्यक ठरते. सोबत दिलेल्या तक्त्यावरून कोणती रोगलक्षणे कोणत्या संस्थांशी संबंधित असतात हे लक्षात येईल. या प्रकरणात फक्त ताप, डोकेदुखी, उलटी, इत्यादी जास्त व्यापक स्वरूपाच्या लक्षणांविषयी पाहू या. तक्त्यात दिल्याप्रमाणे निरनिराळी लक्षणे विशिष्ट संस्थांच्या प्रकरणात दिली आहेत.

या तक्त्यावरून असेही लक्षात येईल, की ताप जवळजवळ कोणत्याही संस्थेच्या आजारामुळे येऊ शकतो. (पण हेही लक्षात घ्या की ताप हा सहसा जंतुदोषामुळेच येतो.)

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday136
mod_vvisit_counterYesterday1208
mod_vvisit_counterThis week11874
mod_vvisit_counterLast week15782
mod_vvisit_counterThis month51751
mod_vvisit_counterLast month59375
mod_vvisit_counterAll days4428907

We have: 10 guests online
Your IP: 54.167.253.186
 , 
Today: नोव्हेंबर 25, 2017
Bharatswasthya