आरोग्यविद्या
Home उवा होणे

उवा होणे

उवा या कीटकवर्गात मोडतात. डोक्याचे केस, जांघेतले केस व कधीकधी पापण्यांचे केस यांच्या मुळाशी उवा अंडी घालतात. त्या अंडयांमधून लिखा बाहेर पडतात. उवा त्वचेच्या वरच्या भागात घरे करतात. त्यामुळे खूप खाज सुटते. डोक्यात एखादीही ऊ असली तरी खूप खाज सुटते. उवांची अंडी केसांच्या मुळांना चिकटून राहतात.

उवा अस्वच्छतेमुळे व निकृष्ट राहणीमानामुळे एकमेकांत पसरतात. एकमेकांचे कपडे, पांघरूण, इत्यादी वस्तूंमार्फत, तसेच प्रवासात - शाळेत जवळ बसल्याने उवा एकमेकांमध्ये पसरतात.

उपचार

(अ) रॉकेल व खोबरेल तेल निम्मे मिसळून रात्री डोक्यास किंवा खाज असलेल्या भागात चोळून लावावे. किंवा याऐवजी बी.एच.सी. चे (गॅमा) पातळ औषध डोक्याच्या केसांना चोळून चोळून लावावे. दुकानात उवांसाठी बाटल्याही मिळतात.

(ब) औषध लावल्यानंतर सकाळी बारीक दातांच्या फणीने मेलेल्या उवा, लिखा काढून टाकाव्यात. यानंतर डोके साबण आणि पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे.

(क) आठवडयाभरात परत औषध लावावे लागते. कारण चुकून राहून गेलेल्या अंडयांमधून लिखा बाहेर पडतात, त्या माराव्या लागतात.

(ड) कपडयांवरच्या उवा मारण्यासाठी कपडे उन्हात ठेवावे. बी.एच.सी. पावडर कपडयांना लावली तरी उवा मरतात.

घरगुती उपाय

(अ) उवांवर सीताफळाच्या पानांचा किंवा बियांचा रस लावणे हा एक उपाय आहे. यासाठी सीताफळाची कोवळी पाने काढून कुटून त्यांचा रस डोक्यास केसांमध्ये चोळून लावावा.

(ब) याऐवजी आणखी एक उपाय म्हणजे खोबरेल तेलात कापूर मिसळून ते तेल डोक्याला, केसांना चोळून लावणे.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday828
mod_vvisit_counterYesterday1614
mod_vvisit_counterThis week12796
mod_vvisit_counterLast week12806
mod_vvisit_counterThis month30548
mod_vvisit_counterLast month53512
mod_vvisit_counterAll days4656656

We have: 22 guests, 3 bots online
Your IP: 54.224.94.8
 , 
Today: मार्च 17, 2018
Bharatswasthya