आरोग्यविद्या
Home हाडांचा कर्करोग

हाडांचा कर्करोग

हाडांचा कर्करोग बहुधा हातापायांच्या लांब हाडांमध्ये सुरू होतो. यात अनेक प्रकार आहेत. पण सर्व प्रकारांत समान घटक म्हणजे हाडावर अचानक होणारी वाढ. हा वाढलेला भाग सहसा दुखत नाही. हाताने दाबून पाहिल्यावर हा भाग हाडासारखाच कठीण लागतो.

हाडांचा कर्करोग बहुतेक शाळकरी वयात येतो. हा आजार घातक असतो. योग्य वेळी निदान झाल्यास काही प्रकारांत औषधोपचाराचा उपयोग होतो. पण आजार मूळ जागेपासून इतरत्र पसरला असेल तर उपचारांचा फायदा होत नाही.

हाडावर अचानक (काही दिवसात) येणारी टणक सूज किंवा गाठ ही या दृष्टीने धोक्याची खूण समजावी. अशावेळी  ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday144
mod_vvisit_counterYesterday2286
mod_vvisit_counterThis week21946
mod_vvisit_counterLast week15769
mod_vvisit_counterThis month41420
mod_vvisit_counterLast month64227
mod_vvisit_counterAll days4484355

We have: 31 guests, 1 bots online
Your IP: 54.145.51.250
 , 
Today: डिसेंबर 16, 2017
Bharatswasthya