आरोग्यविद्या
Home सांधेसूज

सांधेसूज

सांधेदुखी व सांधेसूज यांत फरक असतो. सांधे सुजलेले असतील तरच सांधेसूज म्हणता येईल. याबरोबर सांधेदुखी असेल किंवा नसेलही. सांधेदुखी स्वतंत्रपणे होऊ शकते. उदा. फ्लू, विषमज्वर, इत्यादी आजारांत सूज न येता सांधे दुखतात.

सूज म्हणजे 'आकार वाढणे' या अर्थाने घेतले तर सांधेसूज अनेक कारणांमुळे येते.

-   जंतुदोष, पू, क्षयरोग, इत्यादी जंतूंमुळे येणारी सूज.

-   मुरगळणे, अंतर्गत जखम, रक्तस्राव

-   संधिवात, सांधेहृदय ताप

-   कर्करोग

-   म्हातारपणातील सांधेसूज

सांध्याचा जंतुदोष, पू किंवा क्षयरोग

ही सांधेसूज बहुधा एका सांध्याला येते. गरमपणा, दुखरेपणा, हालचाल कमी होणे यांबरोबरच जंतुदोषाची इतर लक्षणे (ताप, इ.) दिसतात. ही सांधेसूज बहुधा रक्तावाटे जंतू येऊन तयार होते. या आजारात बहुधा मोठे सांधे (उदा. गुडघा) सापडतात. निश्चित निदान करण्यासाठी दुख-या सांध्यातून सुईने पाणी किंवा पू काढून तपासल्यास जंतूंचा प्रकारही कळू शकतो. योग्य वेळी निदान व उपचार झाल्यास सांध्याची हालचाल सुधारते. उपचारास उशीर झाला तर मात्र सांध्यांच्या हालचालींवर मर्यादा येतात. सांधेसूजीवर योग्य निदान, तपासण्या, औषधोपचार, विश्रांती आणि व्यायाम याबद्दल चांगला तज्ञच मार्गदर्शन करू शकतो.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday141
mod_vvisit_counterYesterday2286
mod_vvisit_counterThis week21943
mod_vvisit_counterLast week15769
mod_vvisit_counterThis month41417
mod_vvisit_counterLast month64227
mod_vvisit_counterAll days4484352

We have: 30 guests, 1 bots online
Your IP: 54.145.51.250
 , 
Today: डिसेंबर 16, 2017
Bharatswasthya