आरोग्यविद्या
Home मुडदूस

मुडदूस

मुडदूस हा आजार आता पुष्कळ कमी झाला आहे.

1-2 वर्ष वयाच्या मुलांना जीवनसत्त्व '' कमी पडले तर मुडदूस हा विकार होतो. हा मुख्यतः हाडांचा आजार असून त्यात हाडे व स्नायू दुबळे होऊन वाढ खुंटते. कपाळाचे हाड फुगणे, मनगटाची हाडे जाड होणे, पायांना बाक येणे, पोट मोठे दिसणे, इ. लक्षणे दिसतात. बरगडया आणि छातीचे मधले हाड यांचे सांधे सुजल्यासारखे मोठे दिसतात. त्यामुळे गळयात एक माळच घातल्याप्रमाणे दिसते (याला 'मुडदूस माळ' असे म्हणता येईल.)  अशीच माळ जीवनसत्त्व '' कमी पडल्यानेही होते, मात्र त्यावर दाबल्याने दुखरेपणा जाणवतो तसा मुडदूस माळेत जाणवत नाही. या आजारात मुलांना श्वसनसंस्थेचे आजार वारंवार होतात.

जीवनसत्त्व '' चा डोस दुधात मिसळून पाजणे हा यावरचा चांगला उपाय आहे. मात्र एकदा हाडांचा आकार  बदलला की तो आजार कमी  झाल्यावरही तसाच राहतो. वयाच्या दोन वर्षांनंतर मुले सूर्यप्रकाशात हिंडायला लागतात. त्यामुळे मुडदूस 2 वर्षे वयानंतर राहत नाही.

उशिराचा मुडदूस

प्रौढ स्त्रियांमध्ये पण जीवनसत्त्व '' कमी पडू शकते, विशेषकरून गरोदरपणात असे होऊ शकते. अशा स्त्रियांना हाडे दुखणे, स्नायूंचा अशक्तपणा, कमरेच्या हाडांमध्ये विकृती (वाकडेपणा), इ. त्रास होतो; बाळंतपण अवघड जाते. अशी हाडे दुबळी आणि मऊ होतात आणि सहजपणे मोडतात. अशा मातांच्या दुधातही जीवनसत्त्व '' कमी असते म्हणून त्यांच्या बाळांनाही लवकर मुडदूस होतो. उपचार म्हणून जीवनसत्त्व-ड, चुना (कॅल्शियम) व रोज अर्धा तास सूर्यप्रकाशात थांबणे एवढे पुरते.

असाच आजार वृध्द माणसांनाही होऊ शकतो.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday956
mod_vvisit_counterYesterday1192
mod_vvisit_counterThis week956
mod_vvisit_counterLast week13160
mod_vvisit_counterThis month31868
mod_vvisit_counterLast month53512
mod_vvisit_counterAll days4657976

We have: 16 guests, 5 bots online
Your IP: 106.193.232.27
Chrome 65.0.3325.109, Linux
Today: मार्च 18, 2018
Bharatswasthya