वैद्यकीय उपचार, ग्राहक संरक्षण कायदा आणि रुग्णहक्क
आरोग्यविद्या
Home वैद्यकीय उपचार, ग्राहक संरक्षण कायदा आणि रुग्णहक्क

वैद्यकीय उपचार, ग्राहक संरक्षण कायदा आणि रुग्णहक्क

 

 ग्राहक संरक्षण कायदा आणि वैद्यकीय व्यवसाय

डॉक्टरांकडूनही चुका होतात, पैकी काही निष्काळजीपणामुळे होतात. माणसाची जशी प्रगती होत आहे तसे वैद्यकीय उपचार, तपासण्या वगैरेंचा वापर वाढत जाणे साहजिक आहे. औषधोपचारांचे व वैद्यकीय हस्तक्षेपाचे काही वाईट  परिणाम पण होऊ शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे. यामुळे डॉक्टरी व्यवसायाबद्दलच्या तक्रारी वाढत आहेत. काही थोडया डॉक्टरांचा निष्काळजीपणा, पैसे उकळण्याची प्रवृत्ती यामुळे लोकमतही प्रतिकूल होत चालले आहे. ग्रामीण भागात तर आणखी अडचण आहे. ग्रामीण भागात नव्वद टक्के डॉक्टर्स ऍलोपथीची औषधे प्रशिक्षणाशिवायच वापरत असतात. रोगनिदानही फारसे केलेले नसते. अशा परिस्थितीत, दुसरा चांगला पर्याय नसताना लोकांना  या संकटाला तोंड द्यावे लागते. कायद्यानुसार प्रशिक्षण नसताना औषधे वापरणे चूक आहे व त्याला शिक्षा होऊ शकते. आपण आता ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल माहिती करून घेऊ या.

डॉक्टरांची चूक/निष्काळजीपणा/ औषधांचे दुष्परिणाम

औषधांचे दुष्परिणाम 

 नेहमी होणारे किंवा क्वचित होणारे दुष्परिणाम उदा. ऍस्पिरिनने अल्सरचा आजार वाढणे. असे परिणाम डॉक्टरच्या अपु-या ज्ञानामुळे झाले असतील किंवा निष्काळजीपणामुळे झाले असतील तर त्यासंबंधी तक्रार करता येते. पण सर्व काळजी घेऊनही अनपेक्षितपणे असे झाले तर त्याला दोष/चूक म्हणणे बरोबर नाही. कायदा ते चूक मानत नाही

अनपेक्षित घटना

 वैद्यकीय व्यवहारात अनेक अनपेक्षित घटना घडू शकतात. उदा. बाळंतपणानंतर खूप रक्तस्त्राव होणे, भूल दिलेली असताना हृदयक्रिया बंद पडणे, शस्त्रक्रियेनंतर पू होणे इ. खूप काळजी घेऊन यांची शक्यता/प्रमाण कमी करता येते; पण त्या टळतीलच असे सांगता येत नाही. यामध्ये रुग्ण-डॉक्टरांची एकमेकांवर श्रध्दा व विश्वास असला तर पूर्ण माहिती दिल्यानंतर तक्रारी टळू शकतात. याबद्दल डॉक्टरांवरच जास्त जबाबदारी असते. कित्येक वेळा जाणूनबुजून असा धोका पत्करावा लागतो. उदाहरणार्थ, म्हाता-या माणसावर शस्त्रक्रिया करायची झाल्यास भूल देताना हृदयक्रिया बंद पडण्याचा धोका सदैव हजर असतो. शस्त्रक्रिया अटळ असेल (उदा. खुब्यांचा अस्थिभंग) तर हा धोका पत्करावाच लागतो. मात्र डॉक्टरने हे सर्व नातेवाईकांना नीट सांगितले पाहिजे.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1194
mod_vvisit_counterYesterday1660
mod_vvisit_counterThis week6650
mod_vvisit_counterLast week13888
mod_vvisit_counterThis month33014
mod_vvisit_counterLast month46518
mod_vvisit_counterAll days4201194

We have: 26 guests online
Your IP: 54.92.128.223
 , 
Today: जुलै 20, 2017
Bharatswasthya