आरोग्यविद्या
Home आपल्या शासकीय आरोग्यसेवा

आपल्या शासकीय आरोग्यसेवा

आरोग्यसेवा आरोग्यसेवांमध्ये अनेक सेवांचा समावेश होतो. त्यांचे एक वर्गीकरण खाली दिले आहे.

-  वैद्यकीय उपचार - आजारी पडल्यावर लागणारे उपचार

  प्रतिबंधक उपाययोजना - रोग होऊ नये म्हणून करावी लागणारी उपाययोजना. उदा. लसटोचणीशुध्द पाणीमलमूत्राची व्यवस्था इत्यादी.

  आरोग्यशिक्षण

  साथीचे नियंत्रण

  संततिप्रतिबंधक उपाय

वरील यादीवरून हे लक्षात येईलकी वैद्यकीय उपचार हा आरोग्यसेवेचा केवळ एक लहान भाग आहे. रोग झाल्यावर उपचारांची वेळ येतेतर रोग होऊ नये म्हणून निरनिराळे प्रतिबंधक उपाय करावे लागतात.

आरोग्यसेवा देणारे तीन प्रमुख घटक आहेत : सरकारस्वयंसेवी संस्थाखाजगी व्यावसायिक. या प्रकरणात आपण फक्त पारंपरिक आणि सरकारी आरोग्यसेवांचा विचार करणार आहोत.

सरकारी संस्थांमार्फत आरोग्यसेवेचे जवळजवळ सर्व प्रकार काही अंशी पार पाडले जातात. वैद्यकीय उपचारांसाठी लहान-मोठी इस्पितळेदवाखाने आहेत. अन्नभेसळ रोखणे व पाणी शुध्दीकरणाची देखरेख यासाठी आरोग्य प्रयोगशाळा आहेत. प्राथमिक आरोग्यकेंद्रांमार्फत ग्रामीण भागात या सर्व सेवा एकत्रित स्वरूपात दिल्या जातात. प्राथमिक आरोग्यकेंद्रावर होणा-या उपचाराचे स्वरूप किरकोळ असते व तज्ज्ञसेवांसाठी मोठया रुग्णालयातच जावे लागते. सरकारी सेवा असूनही त्यांचे प्रमाण लोकसंख्येच्या मानाने पुरेसे नाही. ग्रामीण भागात तरी परिस्थिती अगदीच निराशाजनक आहे. 1948 मध्ये झालेल्या भोर कमिटीच्या शिफारशींनुसार पाहिले तरी कालपरवापर्यंत लोकसंख्येच्या प्रमाणात प्राथमिक आरोग्यकेंद्रेग्रामीण रुग्णालयेडॉक्टरनर्सेस वगैरे सेवा उपलब्ध नव्हत्या. 1980 नंतर या त्रुटींचा समग्र आढावा घ्यायला सुरुवात झाली व लोकसंख्येच्या प्रमाणात प्राथमिक आरोग्यकेंद्रे व डॉक्टर,परिचारिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालला आहे. आरोग्य केंद्रे संख्येने पुरेशी झाली तरी कामकाजाच्या दृष्टीने अद्याप प्रगती व्हायची आहे. ग्रामीण इस्पितळांची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. जे उपचार ग्रामीण रुग्णालयात व्हायला हवेत त्यासाठी अजूनही जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते.

स्वयंसेवी संस्थांचा (म्हणजे काही मंडळींनी एकत्र येऊन स्थापलेली सेवाभावी संस्था) वाटा त्या मानाने कमी आहे. स्वयंसेवी संस्था मुख्यत्वेकरून शहरांमधून काम करतात. अशा संस्था बहुधा मोठी इस्पितळे चालवतात. काही संस्था ग्रामीण आरोग्यसेवांसाठी शाखा चालवतात.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1043
mod_vvisit_counterYesterday2307
mod_vvisit_counterThis week11573
mod_vvisit_counterLast week15782
mod_vvisit_counterThis month51450
mod_vvisit_counterLast month59375
mod_vvisit_counterAll days4428606

We have: 11 guests, 4 bots online
Your IP: 59.90.42.107
Internet Explorer 8.0, Windows
Today: नोव्हेंबर 24, 2017
Bharatswasthya