आरोग्यविद्या
Home रक्ताभिसरण संस्थेचे आजार

रक्ताभिसरण संस्थेचे आजार

प्रास्ताविक

हृदयविकाराचा झटका, अतिरक्तदाब, इत्यादी आजारांबद्दल आपण ऐकलेले आहे. भारतातही या आजारांचे प्रमाण वाढत आहे.  हे आजार बहुधा सुखवस्तू समाजात जास्त असतात. युरोप, अमेरिका तसेच आपल्याकडच्या शहरी सुखवस्तू समाजात हृदयविकार हे मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. गरीब वर्गात सांधेहृदय ताप हा आजार जास्त महत्त्वाचा आहे. मात्र आता ग्रामीण भागातही अतिरक्तदाब व मधुमेह या आजारांचे प्रमाण वाढत आहे.

या सर्व आजारांना प्रतिबंध करणे महत्त्वाचे आहे. पण त्यांची पाळे मुळे समाजजीवनात, राहणीमानात आहेत. शरीर श्रमाची कामे, नियमित व्यायाम व साधा आहार (चरबीयुक्त आहार कमी खाणे) या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अशी जीवनपध्दती आपण स्वीकारली तर या आजारांचे प्रमाण कमी होईल. आज आपण आरोग्यशिक्षण करणे व आजार लवकरात लवकर शोधणे एवढे महत्त्वाचे काम करू शकतो. सांधेहृदयताप, अतिरक्तदाब व हृदयविकार या तीन्ही आजारांचे लवकर निदान होणे आवश्यक आहे.

या प्रकरणात या संस्थेच्या काही निवडक आजारांची चर्चा केली आहे. शरीररचना, कार्य, इत्यादी तपशील पहिल्या प्रकरणातच दिला आहे.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday117
mod_vvisit_counterYesterday2463
mod_vvisit_counterThis week117
mod_vvisit_counterLast week12775
mod_vvisit_counterThis month37678
mod_vvisit_counterLast month48866
mod_vvisit_counterAll days4305159

We have: 7 guests, 1 bots online
Your IP: 49.35.8.215
Chrome 42.0.2311.111, Linux
Today: सप्टेंबर 24, 2017
Bharatswasthya