आरोग्यविद्या
Home वसा आरोग्यशिक्षणाचा

वसा आरोग्यशिक्षणाचा

 

आरोग्यकारक विचारांचा, सवयींचा समाजात प्रसार व्हावा म्हणून आपण सतत प्रयत्न केला पाहिजे. हजारो गोळया, औषधे, इंजेक्शनांनी जे काम होत नाही ते साध्या उपायांनी, चांगल्या सवयींनी होऊ शकते. उदाहरणार्थ, दारूच्या व्यसनापासून समाजाची मुक्ती ही लाखो लोकांचे आजार आणि दुःख टाळू शकते. काही देशांमध्ये मांसाहाराचा अतिरेक टाळण्याचे पध्दतशीर प्रयत्न झाले, त्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण कमी झाले. हे काम अनेक रूग्णालये सुरू करूनही झाले नसते. मच्छरदाणीचा नियमित वापर करायला शिकवणे हे शेकडो लोकांना दरवर्षी मलेरियाच्या गोळया देण्यापेक्षा महत्त्वाचे आहे. दिसायला साध्या, सोप्या गोष्टींचा प्रसार करून सामाजिक आरोग्य कसे वाढू शकते याची ही उदाहरणे आहेत. अशी अगणित उदाहरणे आहेत. म्हणूनच आपण आरोग्यशिक्षण ही महत्त्वाची जबाबदारी समजून जमेल तितके प्रयत्न करीत राहिले पाहिजे. यासाठी सहज होतील अशा प्रयत्नांबरोबरच काही पध्दतशीर काम करणेही आवश्यक असते.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1004
mod_vvisit_counterYesterday1919
mod_vvisit_counterThis week5595
mod_vvisit_counterLast week11187
mod_vvisit_counterThis month30381
mod_vvisit_counterLast month48866
mod_vvisit_counterAll days4297862

We have: 12 guests, 1 bots online
Your IP: 49.44.51.67
Safari 534.30, Linux
Today: सप्टेंबर 20, 2017
Bharatswasthya