आरोग्यविद्या
Home समाजाचे आरोग्य व मानवविकास

समाजाचे आरोग्य आणि मानवविकास

 

जेव्हा डॉक्टर एखाद्या रुग्णास तपासतो तेव्हा ही एक वैयक्तिक पातळीवरची बाब असते. एकूण डॉक्टरी उपचार हे जीवशास्त्रीय पातळीवरच असल्याने वैयक्तिक उपचाराचे स्वरुप जवळजवळ पूर्ण शारीरिक-मानसिकच असते. त्या रुग्णाचा तेवढा आजार संपला की झाले!

पण अनेक आजारांची कारणे आणि उपायही केवळ वैयक्तिक किंवा शारीरिक पातळीवरचे नसतात. आजारांची कारणपरंपरा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, अशा अनेक घटकांमध्ये गुंतलेली असते. उदा. लिंगसांसर्गिक आजारांच्या मागे 'जंतू' हे कारण आहे पण त्यामागे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक कारण परंपराही आहे. म्हणून लिंगसांसर्गिक आजार हटवायचे असतील तर या सगळयाच पातळयांवर प्रयत्न करावे लागतील. अशी उपाययोजना केवळ वैयक्तिक नसते, तर ती सामूहिक स्वरुपाची असते.

आजारांवर विचार आणि उपाययोजना करताना वैयक्तिक आणि केवळ जीवशास्त्रीय पातळीच्या पलीकडे जावे लागते. आरोग्यासाठी सामूहिक आणि अनेकपदरी विचार व कृती करणे यालाच 'सामाजिक आरोग्यशास्त्र' असे म्हणता येईल. यात अनेक उपविषय येतात.

- रोगांचा सामूहिक स्तरांवर अभ्यास (उदा. साथींचा अभ्यास)

- सार्वजनिक स्वच्छता

- आरोग्यसेवांचे नियोजन व नियंत्रण

- रोगप्रतिबंध करण्याचे अनेक उपाय

- सर्वांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न

सामाजिक आरोग्यशास्त्रात रोगप्रतिबंधक आणि आरोग्यवर्धक उपायांचा महत्त्वाचा घटक आहे. रोगप्रतिबंध म्हणजे रोग-आजार टाळणे. पण हे म्हणजे केवळ लसीकरण नाही. आयुर्वेदामध्ये आणि लोकपरंपरांमध्येही अनेक प्रतिबंधक आणि आरोग्यवर्धक उपाय अंतर्भूत आहेत. उदा. वात, पित्त, कफ प्रकृती विचारातून आणि आहारविहारातून अनेक आजार टाळता येतात अशी आयुर्वेदाची साधार मांडणी आहे. यातल्या अनेक गोष्टी सांस्कृतिक-सामाजिक जीवनात एकरूप होऊन गेल्या आहेत. उदा. लहान मुलांना अंगाला व टाळूला तेल चोळणे, डाळतांदूळ एकत्र शिजवणे इत्यादी. आधुनिक विज्ञानाने तर सार्वजनिक आरोग्यशास्त्रात क्रांती केली आहे.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday735
mod_vvisit_counterYesterday1940
mod_vvisit_counterThis week2675
mod_vvisit_counterLast week12883
mod_vvisit_counterThis month32140
mod_vvisit_counterLast month52342
mod_vvisit_counterAll days4602838

We have: 28 guests, 5 bots online
Your IP: 2401:4900:1903:1fbd:727c:f8a6:f287:bc84
Chrome 64.0.3282.137, Linux
Today: फेब्रु 19, 2018
Bharatswasthya