आरोग्यविद्या
Home स्वच्छ पाणी

स्वच्छ पाणी

 प्रस्तावना

शहरांमध्ये पाणीपुरवठा नद्या व धरणे यांतून होतो, तर खेडयांमध्ये विहिरी आणि कूपनलिकांमधून पाणी पुरवले जाते.

पिण्याचे स्वच्छ आणि मुबलक पाणी ही जीवनाची एक मूलभूत गरज आहे. पाणी टंचाईचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याचा जमाखर्च बिघडणे. एकीकडे शहरांसाठी आणि शेतीसाठी पाण्याचा वाढता वापर ही झाली पाण्याच्या वाढत्या खर्चाची बाजू. मात्र जमिनीच्या पोटातल्या साठयात भर पडत नाही. तसेच जमिनीच्या वरच्या थराची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. यामुळे पाण्याच्या जमेची बाजू लंगडी झालेली आहे. पर्यावरण बिघडल्याने पाणी जिरण्याची क्रिया दुबळी झालेली आहे. आता आपल्याला पाणी 'अडवा-जिरवा' साठवा-वाचवा कार्यक्रम आवश्यक आहे.

पाणी टंचाईचे कारण काही असले तरी त्याचे परिणाम आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत.

- पाणी टंचाईमुळे स्वच्छता राहत नाही. पुरेसे पाणी असणे हे ते शुध्द असण्याइतकेच महत्त्वाचे आहे. शहरी वस्तीला दरडोई 200 लिटर (किमान 40 लिटर) रोज इतकी गरज गृहीत धरतात. (अनेक मोठया शहरांत आता इतके पाणी मिळू शकत नाही.) खेडयात शेतीसाठी होणारा पाण्याचा वापर सोडला तर दरडोई 200 लिटर हीच गरज धरायला पाहिजे. प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठी मैलोन्मैल लांब पायपीट करावी लागते आणि प्रसंगी वाटीवाटीने घागरीत भरून पाणी आणावे लागते.

- पाणीटंचाईमुळे मिळेल ते पाणी वापरावे
लागते. अयोग्य वापराने असणारे साठे अशुध्द होतात त्यामुळे शुध्द पाणी मिळण्याची शक्यता कमी होते.

अशुध्द पाणी व कमी पाणी या दोन्हींचे आरोग्यावर होणारे परिणाम घातक आहेत. आपल्याकडचे निम्मे आजार अशुध्द पाणी आणि अस्वच्छतेमुळे होतात. पटकी, गॅस्ट्रो, पोलिओ, कावीळ, हगवण, जंत, त्वचारोग, विषमज्वर, इत्यादी अनेक आजार अशुध्द पाणी व अस्वच्छता यांमुळेच होतात. यातून कुपोषण वाढते.

शुध्द पाणीपुरवठा व स्वच्छता या उपायांनी औषधोपचारांची गरज निम्म्याने कमी होईल. आयुर्मान वाढेल व खाल्लेले अन्न चांगले अंगी लागेल. सर्वांना शुध्द आणि भरपूर पाणी मिळणे हा आपल्यासमोरचा मोठा प्रश्न आहे.

 
चलचित्र / छायाचित्र संग्रह
वृत्तपत्र लेखन
लॉगिन करा
mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterToday1316
mod_vvisit_counterYesterday1313
mod_vvisit_counterThis week8085
mod_vvisit_counterLast week11437
mod_vvisit_counterThis month35764
mod_vvisit_counterLast month46518
mod_vvisit_counterAll days4203944

We have: 13 guests, 2 bots online
Your IP: 106.79.139.63
Firefox 54.0, Windows
Today: जुलै 22, 2017
Bharatswasthya