अक्युप्रेशर किंवा मर्मबिंदूमर्दन औषध विज्ञान व आयुर्वेदनवशिक्यांनी फार जोराने दाबू नये.
अक्युप्रेशर म्हणजे कोणत्याही आजारावर रामबाण उपाय नाही हे लक्षात ठेवा, काही आजारांना इतर उपचार लागू पडतील. मात्र अनुभवाने अक्युप्रेशरने अधिकाधिक आजारांवर उपचार करता येतील हे खरे. अक्युप्रेशर हे शास्त्रही आहे आणि कलाही. योग्य गुरूच्या हाताखाली ही विद्या शिकून घ्या. या विद्येसाठी शरीरशास्त्राचे काही ज्ञान आवश्यक आहे.
हे उपचार नेमके कसे लागू पडतात याबद्दल काही ठोकताळे आहेत.
या शास्त्राप्रमाणे शरीरात अनेक ऊर्जावाहक रेषा असतात. मर्मबिंदूदबावामुळे हे ऊर्जावहन थांबते किंवा वाढते. यामुळे संबंधित अवयवावर परिणाम होतो. मर्मचिकित्सेमुळे विद्युत-ऊर्जा किंवा सूक्ष्मरसायने निर्माण होतात, त्यामुळे आजार बरा होतो. असेही एक मत आहे.
खरे म्हणजे अक्युपंक्चर (टोचणे) हे केवळ दबावापेक्षा जास्त उपकारक आहे. पण मर्मबिंदूदबावाचे तंत्र शिकायला जास्त सोपे आहे. हे उपचार खालील विकारात विशेष करून उपयुक्त ठरतात – मान आखडणे/ धरणे, डोकेदुखी, ठिकठिकाणी वेदना/ दुखी, थकवा,, इ. साठी थोडे प्रशिक्षण आवश्यक आहे, मात्र कोणीही हे तंत्र शिकू शकेल.