respiratory icon श्वसनसंस्थेचे काही गंभीर आजार श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार
श्वसनसंस्थेची तपासणी
नाक

नाकाची तपासणी दोन -तीन बाबतींत करावी लागते.

  • नाकात काही गेले असल्यास
  • श्वासोच्छ्वासात नाकामुळे काही अडचण, अडथळा वाटत असल्यास
  • नाकाचा मधला पडदा एका बाजूला फारच फुगला असेल, (यालाच नाकातील हाड वाढणे असा चुकीचा शब्दप्रयोग करतात) वाकडा झाला असेल तर, किंवा नाकाच्या आतले आवरण सुजून हवेची वाट अरुंद होत असेल.
घसा

घसादुखी, कोरडा खोकला, आवाज बदलणे, गिळायला त्रास होणे, ताप, सर्दी या बाबतीत घशाची तपासणी अवश्य करावी.

लहान मुलांत प्रत्येक तापाच्या बाबतीत घसा तपासावा.

घशात तपासण्याच्या मुख्य गोष्टी म्हणजे टॉन्सिलच्या ग्रंथी आणि घशाची पाठभिंत.

टॉन्सिल

सर्वांना जन्मतः टॉन्सिल असतातच. टॉन्सिल हे संरक्षक द्वारपालाचे काम करीत असतात. व वयाच्या 10-12 वर्षांपर्यंत ते आकाराने मोठेच असतात. त्यानंतर ते हळूहळू कमी होऊन गावठी बोराच्या आकाराचे होतात व कायम तेवढेच राहतात. लहानपणी कधी कधी टॉन्सिलवर सूज येते. अचानक सूज, ताप, घसादुखी ,टॉन्सिल लालभडक व सुजलेले दिसतात. काही वेळा पू देखील येतो टॉन्सिलवर पांढरा भुरका पडदा बसला असेल तर घटसर्प असू शकेल.

वारंवार टॉन्सिल सुजत असतील तर गाठी सुजून मोठया होतात व त्यावर ठिपके दिसतात.

या टप्प्यातील सर्व उपचार समक्ष घ्यायचे आहेत.

या टप्प्यात दर आठवडयास/पंधरवडयास एकदा समक्ष, उरलेले उपचार घरी

*** शेवटची बेडका तपासणी जंतुयुक्त आल्यास प्रवर्ग 2 मध्ये घालून नव्याने उपचार करावे.

पहिली बेडका तपासणी 3 नमुन्यांची मिळून (लगोलग, रात्रभर जमा केलेली, त्यानंतर लगेच). नंतरच्या तपासण्या 2 नमुन्यांच्या मिळून

स्वरयंत्र

आवाज बदललेला असेल तर बहुतेक वेळा स्वरयंत्रावर सूज असते. स्वरयंत्र म्हणजे घशाच्या थोडया खाली असलेली एक पेटी असते. उतारवयात आवाज घोगरा होणे, बदलणे वगैरे आढळल्यास घशाच्या कर्करोगाची शक्यता असते. यासाठी खास लांब दांडा असलेल्या आरशाने स्वरयंत्राची तपासणी करावी लागेल. याला थोडा अनुभव लागतो. कानाघ तज्ञ ही तपासणी करू शकतात.

आवाजनळी

स्टेथोस्कोप हे एक फार साधे यंत्र आहे. त्याच्या एका बाजूला आवाज पकडण्यासाठी एक ताणलेला पडदा असतो व त्या पडद्याची हालचाल (आवाजाने) नळीवाटे डॉक्टरांच्या दोन्ही कानात पोचवली जाते. या यंत्राची किंमत 50-100 रुपये असते. ‘डिग्री’ म्हणजे हे यंत्र नसून ‘तापनळी’ होय. स्टेथॉस्कोपला आपण आवाजनळी म्हणू या.

फुप्फुसे

आवाजनळी तुमच्याकडे असेल तर ती छातीवर टेकवून जागोजागी हवा नीट चालते की नाही, की अडथळा येतो हे पाहता येते. छातीच्या दोन्ही बाजूंना समप्रमाणात हवा चालत नसेल तर कोठल्या तरी बाजूला दोष असण्याची शक्यता असते. हवा कमी चालत असेल किंवा फार जास्त चालत असेल तर दोष असू शकतो.

फुप्फुसाची तपासणी म्हणजे हवा सगळीकडे कशी, किती जाते हेच तपासणे. आवाजनळीने दोन गोष्टी चांगल्या समजतात. एक म्हणजे ‘क्रेप’ किंवा ‘बुडबुडे’. आल्यामुळे फुप्फुसातून श्वासनलिकांमध्ये थोडेसे पाणी किंवा द्रव, हवा यातून जाताना बुडबुडयांचा आवाज येतो. हे बुडबुडे खूप सूक्ष्म असतात. त्यांचा आवाज कांद्याच्या वाळलेल्या पापुद्रयासारखा किंवा वाळलेल्या गवताचे एकमेकांवर घासल्यासारखा येतो. पाण्याचा किंवा द्रवाचा अडथळा सूक्ष्म श्वासनलिकांमध्ये असेल तर हा आवाज मोठा येतो.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवाजनळीने हृदयाच्या झडपांचे आवाज व त्यातील बिघाड कळतात. तसेच ती पोटावर ठेवून आतडयांतील हालचालींबद्दल माहिती मिळू शकते.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.