डोळ्याचे आजार कानाचे आजार
डोळयामध्ये कचरा, कण जाणे

eyes drop डोळयामध्ये कचरा, धातूचे कण, कीटक, इत्यादी जाणे ही वारंवार आढळणारी तक्रार आहे. धान्याचे तूस, झाडाच्या फांद्या, काटे, गाईगुरांचे शेपूट, शिंग, इत्यादींमुळे डोळयांना जखमा होण्याच्या घटना ग्रामीण भागात नेहमी आढळतात. कामगारांना डोळयात कचरा, कण जाण्याचा प्रकार वारंवार आढळतो. यावर प्रतिबंध म्हणून गॉगल लावायला पाहिजे. अशा वेळी नीट तपासणी करून बुबुळाची जखम शोधा. वाहन चालवताना गॉगल/ चष्मा न घालणे हे ही याचे एक नेहमीचे कारण आहे. त्यामुळे डोळा लाल होणे, पाणी सुटणे, वेदना, इत्यादी त्रास होतो. पण डोळे येण्याच्या सुरुवातीसही डोळयात काही तरी गेल्याची भावना होत असते.

तपासणीत डोळा पूर्ण उघडून व बुबुळाच्या बाजूच्या पांढ-या भागावर पापण्यांच्या आतल्या बाजूस नीट तपासणी करावी. दिसत असेल तर कण, कचरा, इत्यादी ओल्या कापसाच्या बोळयाच्या टोकाने काढून टाकावा. यानंतर डोळा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायला सांगावे. याबरोबरच बुबुळाची काळजीपूर्वक आणि सावकाश तपासणी करणे आवश्यक आहे.

फूल पडणे (बुबुळावर पांढरट डाग)
iris white mark
iris-small-mark

 

बुबुळाचा दाह होऊन जखम झाल्यामुळे कायमचा दृष्टीदोष येऊ शकतो. फूल मोठे व मध्यभागी असल्यास प्रकाशकिरण शिरू शकत नसल्याने डोळा निकामी होतो. या दोषामुळे भारतात लाखो मुलांचे डोळे अधू झालेले आहेत.

बुबुळ दाहाची कारणे
  • ‘अ’ जीवनसत्त्वाचा अभाव – ‘अ’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे बुबुळावर जखमा तयार होऊन पुढे फूल पडते. कुपोषणामुळे डोळयांच्या आतही (नेत्रपटल) नुकसान होते. हे टाळण्यासाठी दर सहा महिन्यांनी सहा वर्षापर्यंत मुलांना ‘अ’ जीवनसत्त्वाचा डोस द्यावा. ‘अ’ जीवनसत्त्व असलेले पदार्थ आपल्या आहारात असावेत. रातांधळेपणा हीच या आजाराची सुरुवात असते हे लक्षात ठेवा.
  • डोळे येण्यामुळे – कधीकधी जंतुदोषाने बुबुळावर जखम होऊन फूल पडते.
  • खुप-या – (हा आजार आता पुष्कळ कमी झाला आहे.)
  • जखम होऊन फूल पडणे – डोळयांत बुबुळावर रासायनिक पदार्थ, लोखंड, काच, इत्यादींचे कण व ठिणग्या वगैरे पडून जखम होते व नंतर फूल पडते.
उपचार

जखम झाल्यानंतर ताबडतोब दखल घेणे आवश्यक आहे. बुबुळात काही रुतले असल्यास किंवा जखम असल्यास लगेच डोळयांच्या डॉक्टरांकडे न्यावे. तोपर्यंत नुसते जंतुविरोधी औषधांचे थेंब टाकून पट्टी बांधावी.

डोळयाच्या आरोग्यासाठी सूचना

लवकरच उपलब्ध होईल…

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.