तोंडाला वास येणे म्हणजे श्वासाला वास येणे. हा दुर्गंध दोन कारणांनी येतो. एक म्हणजे पोटात अपचनासारखे आजार असणे. याशिवाय आहारात कांदा, मासे, लसूण असल्यास यामुळेही वास येतो.
दुसरे कारण म्हणजे तोंडातल्या अस्वच्छतेमुळे जंतूंची वाढ होऊन कुजण्याची प्रक्रिया होणे. घाण वास येण्यामागे बहुतेक वेळा हे दुसरे कारण आढळते.
म्हातारपणात लाळेचे प्रमाण कमी पडते. त्यामुळे तोंडाची स्वच्छता कमी राहते. म्हातारपणात दुर्गंध येण्याचे हे एक कारण आहे. वारंवार चुळा भरून स्वच्छता ठेवणे हाच यावरचा सोपा उपाय आहे.
दात तपासण्यासाठी एक चमचा (जीभ दाबण्यासाठी) व प्रकाशझोत लागतो. तपासताना खालील गोष्टींचे निरीक्षण करा.
दातांचे आरोग्य मोजण्यासाठी एक पध्दत म्हणजे किडलेले (Decayed) पडलेले (Missing) आणि भरलेले (Filled) दात मोजणे. याला इंग्रजीत DMF गणना म्हणतात. विशेष करून दातांच्या सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो. स्वच्छतेच्या सवयी, खाण्याच्या सवयी, पाण्यातील फ्लोराईड, अनुवंशिकता, इत्यादी घटकांवर DMF ठरतो. DMFT हे कायमच्या दातांसाठी वापरायचे मोजमाप आहे. DMFT हे दुधाच्या दातांसाठी वापरतात.