Ayurveda Icon अक्युप्रेशर किंवा मर्मबिंदूमर्दन औषध विज्ञान व आयुर्वेद
काही सूचना

नवशिक्यांनी फार जोराने दाबू नये.

 • कोणत्याही सुजेवर वा गाठीवर दाबू नये.
 • जखम किंवा दाह असेल तिथे दाबू नये.
 • तीव्र/अचानक आलेला आजार असल्यास मऊपणे दाबावे, जोराने नको.
 • गरोदरपणात ही पध्दत वापरू नये.
 • नवजात बालकांसाठी ही पध्दत वापरू नये.
 • अतिवृध्दांना हे उपचार करू नका.
 • मणक्यांची कूर्चा सरकलेली असल्यास (म्हणजेच पाठीच्या कण्यावर खूप वेदना असल्यास) (Spondylysis) हे उपचार तुम्ही करू नका.
 • उपचाराने आराम वाटत नसल्यास, इतर औषधोपचारांसाठी डॉक्टरकडे पाठवून द्या.
 • चुकीचा बिंदू दाबल्यास नुकसान नाही, पण चुकीच्या पध्दतीने दाबल्यास नुकसान होऊ शकते.
 • हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी जास्त काळजी घ्यावी लागते.
 • रुग्णाच्या जेवणानंतर दोन तास थांबूनच उपचार करावे.
 • रुग्ण उपाशी असल्यास उपचार करू नका.
 • मर्मचिकित्सेच्या दिवसांमध्ये काही अन्नपदार्थ टाळणे आवश्यक आहे (तिखट पदार्थ, मिरी, समुद्रातले पदार्थ – मासे, इ.)
 • रुग्णाने उपचारानंतर दोन तासांनी आंघोळ करावी, त्या आधी नको.
 • आपली नखे स्वच्छ व कापलेली असावीत, म्हणजे इजा होणार नाही.
 • आजार ओळखा, मगच उपचार करा.

अक्युप्रेशर म्हणजे कोणत्याही आजारावर रामबाण उपाय नाही हे लक्षात ठेवा, काही आजारांना इतर उपचार लागू पडतील. मात्र अनुभवाने अक्युप्रेशरने अधिकाधिक आजारांवर उपचार करता येतील हे खरे. अक्युप्रेशर हे शास्त्रही आहे आणि कलाही. योग्य गुरूच्या हाताखाली ही विद्या शिकून घ्या. या विद्येसाठी शरीरशास्त्राचे काही ज्ञान आवश्यक आहे.
हे उपचार नेमके कसे लागू पडतात याबद्दल काही ठोकताळे आहेत.

 • वेदना-शामन
 • बदलांशी जुळवून घेण्यास शरीराला मदत
 • मानसिक परिणाम (मनामार्फत उपचार)
 • शांती वाटणे
 • शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे
 • इतर परिणाम (ताप, वावडे, इ. कमी करणे)

या शास्त्राप्रमाणे शरीरात अनेक ऊर्जावाहक रेषा असतात. मर्मबिंदूदबावामुळे हे ऊर्जावहन थांबते किंवा वाढते. यामुळे संबंधित अवयवावर परिणाम होतो. मर्मचिकित्सेमुळे विद्युत-ऊर्जा किंवा सूक्ष्मरसायने निर्माण होतात, त्यामुळे आजार बरा होतो. असेही एक मत आहे.
खरे म्हणजे अक्युपंक्चर (टोचणे) हे केवळ दबावापेक्षा जास्त उपकारक आहे. पण मर्मबिंदूदबावाचे तंत्र शिकायला जास्त सोपे आहे. हे उपचार खालील विकारात विशेष करून उपयुक्त ठरतात – मान आखडणे/ धरणे, डोकेदुखी, ठिकठिकाणी वेदना/ दुखी, थकवा,, इ. साठी थोडे प्रशिक्षण आवश्यक आहे, मात्र कोणीही हे तंत्र शिकू शकेल.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.