Exercise Icon व्यायाम आणि खेळ आरोग्यासाठी योगशास्त्र
व्यायामाचा वेग

व्यायामातला वेग हा एक विशेष घटक आहे. काहीजणांना जात्याच जास्त वेग असतो. याचे कारण स्नायूंमधल्या तंतुप्रकारांचे प्रमाण असते. स्नायूंमध्ये दोन प्रकारचे तंतू असतात. वेगवान व मंद. यांच्या परस्परप्रमाणावर वेग ठरतो. हे ठरते बरेचसे अनुवंशिकतेवर. काही खेळांना/व्यायामांना वेग लागतो- उदा. पळणे, बॅडमिंटन, उडी, खोखो इ. या खेळात आपोआप जात्याच वेगवान व्यक्तींचा भरणा असतो. काही व्यायांमात (वजन उचलणे, कुस्ती) मंद तंतुप्रकारांचे जास्त काम असते त्यामुळे या व्यायाम प्रकारात जास्त करून अशाच मंद वेगाच्या व्यक्ती असतात.

प्रशिक्षणामुळे या वेगात थोडाफार फरक पडतो. पण मूळ आनुवंशिक ठेवण बदलत नाही. म्हणून यशासाठी खेळाडूंची योग्य निवड महत्त्वाची असते.

स्त्रिया आणि व्यायाम

Cycling स्त्रियांना व्यायामाची पुरुषांइतकीच गरज असते. मात्र प्रत्यक्षात त्यांना जास्त प्रमाणात काबाडकष्टच करावे लागतात. गरोदरपणात व बाळंतपणानंतर महिनाभर व्यायाम करणे अवघड असते. तरीही या काळात चालण्यासारखे सौम्य व्यायाम घ्यावेच. ओटीपोटाचे विशेष व्यायाम (पहा: स्त्री जननसंस्थेचे आजार) स्त्रियांसाठी महत्त्वाचे आहेत.

काबाडकष्ट (उदा. मैल मैल पाणी आणणे) हा सातत्याचाच एक प्रकार आहे. मात्र यात व्यायामाचे सर्वांगीण फायदे नसतात. म्हणून स्त्रियांनी काही वेगळया प्रकारचे व्यायाम- (उदा.फुगडया) करावेत.

स्त्रियांना सर्व खेळांची क्षेत्रे मोकळी असली तरी पुरुष समाजव्यवस्था यावर बंधने आणण्याचा प्रयत्न करते. लवकर होणा-या लग्नांनी या बंधनात भरच पडते.

स्त्री आणि पुरुषांच्या शरीराच्या ठेवणीत काही फरक असल्यामुळे काही व्यायामप्रकार (उदा. कुस्ती) पुरुषांना तर काही स्त्रियांना बरे पडतात. काही व्यायाम प्रकारात स्त्रियांची बरोबरी पुरुषांना अशक्य असते. (उदा. जिम्नॅस्टिक्स).

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.