Sterility Icon वंध्यत्व कुटुंब नियोजन
वंध्यत्व

Infertility Blame एखाद्या जोडप्याला मूलबाळ होत नसल्यास दोघांपैकी एकात किंवा दोघांमध्ये जीवशास्त्रीय दोष असू शकतो. वंध्यत्वाची तक्रार असलेल्या जोडप्यांपैकी 33 टक्क्यांत पुरुषाकडे दोष असतो. 33 टक्क्यांत स्त्रीमध्ये तर उरलेल्यांत दोघांमध्येही दोष असतो असे आढळले आहे.

संभोगाबद्दल अज्ञान, भीती, शुक्रपेशींची कमतरता, स्त्रीबीज तयार न होणे , गर्भनलिका रोगामुळे बंद होणे, गर्भाशयात गर्भ न राहणे इत्यादी प्रकारची कारणे वंध्यत्वामागे असू शकतात. मधुमेह, रक्तपांढरी इत्यादी आजारांत स्त्री-पुरुषबीज तयार होण्याची शक्यता कमी होते. लिंगसांसर्गिक आजार व क्षयरोग यांमुळे गर्भनलिका बंद होतात. यामुळे स्त्रीबीज गर्भाशयात येऊ शकत नाही.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.