Roustabout Health Icon व्यवसायजन्य आजार आणि आरोग्य
राज्य कामगार विमा योजना

state workers insurance scheme कामगार आणि त्यांची कुटुंबे यांच्या आरोग्यरक्षणासाठी व औषधोपचारासाठी ही योजना चालवण्यात येते. यात कामगार, मालक, सरकार या तिघांची वर्गणी असते. ठरावीक वेतनपातळी असणा-या सर्व कारखान्यांत ही योजना सक्तीची आहे. काही कारखान्यांत वेतन जास्त असल्याने कामगारांसाठी स्वतंत्र योजना आहेत. राज्य कामगार विमा योजनेत कामगारास खालील फायदे मिळतात

  • आरोग्य तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया, इ.
  • वैद्यकीय रजा, रजाकाळात वेतन व भत्ता.
  • रुग्णवाहिका खर्च, मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारांचा खर्च.

या योजनेत वैद्यकीय सेवेची व्यवस्था दोन प्रकारे केलेली असते

  • मान्यताप्राप्त खाजगी डॉक्टरांमार्फत तपासणी, सल्ला, उपचार. यासाठी नोंदणीकृत डॉक्टरांकडे कामगार कुटुंबे नोंदवावी लागतात. औषधे विमा योजनेतूनच मिळतात.
  • मोठया शहरात राज्य कामगार विमा योजनेची रुग्णालये असतात. यांत सर्व प्रकारच्या तज्ज्ञसेवा मिळतात.
    ही योजना महत्त्वाकांक्षी आहे. पण यात मिळणा-या वैद्यकीय सेवांच्या दर्जाबद्दल कामगार मोठया प्रमाणात नाराज असतात व इतरत्र उपचार घेतात. रजा, वेतन, भत्ता या फायद्यांसाठी योजनेचा गैरवापर होत असल्याने डॉक्टरही त्रस्त असतात. शिवाय उधळपट्टीचा प्रश्न कायमच असतो. तरीही विमातत्त्वावर मोफत उपचार हे त्याचे चांगले अंग आहे याबद्दल शंका नाही.

काही कारखान्यांच्या स्वत:च्या आरोग्ययोजना आहेत. त्यात कारखान्याचा मोठा निधी असतो. कारखान्यात काही पगारी डॉक्टर असतात तसेच कारखान्याबाहेर खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना मान्यता दिलेली असते. यात कारखानाच बहुतेक बिल भरत असल्याने एकूणच वैद्यकीय सेवांचा खर्च चढा होत गेलेला आहे. अशा योजना हळूहळू महाग होत जातात हा सर्वत्र अनुभव आहे. इतर नागरिक वैद्यकीय सेवेच्या या चढत्या दरांमुळे हैराण होतात.

 

डॉ. शाम अष्टेकर २१, चेरी हिल सोसायटी, पाईपलाईन रोड, आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२ ०१३. महाराष्ट्र, भारत

message-icon shyamashtekar@yahoo.com     ashtekar.shyam@gmail.com     bharatswasthya@gmail.com

© 2017 arogyavidya.net | All Rights Reserved.